Jump to content

मेघालयचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मेघालयचे मुख्यमंत्री
Chief Minister of The State of Meghalaya
मेघालयची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
कॉनराड पुर्णो संगमा
(नॅशनल पीपल्स पार्टी)

६ मार्च २०१८ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता मेघालय विधानसभा
वरिष्ठ अधिकारी मेघालयचे राज्यपाल
नियुक्ती कर्ता मेघालयचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती २ एप्रिल १९७०
पहिले पदधारक विल्यमसन ए. संगमा

मेघालयचा मुख्यमंत्री हा भारताच्या मेघालय राज्याचा सरकारप्रमुख व विधानसभेचा प्रमुख नेता असतो. पाच वर्षांचा कार्यकाळ असलेला मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकांद्वारे निवडला जातो व मेघालयच्या राज्यपालाकडून पदनियुक्त केला जातो. मुख्यमंत्री व त्याने नियुक्त केलेले मंत्रीमंडळ मेघालय राज्याच्या कामकाजासाठी जबाबदार आहे.

१९७० सालापासून एकूण १२ व्यक्ती मेघालयच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत ज्यापैकी ६ मुख्यमंत्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. नॅशनल पीपल्स पार्टीचे कॉनराड संगमा हे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

यादी

[संपादन]
क्र. नाव कार्यकाळ[] पक्ष
विल्यमसन ए. संगमा 2 एप्रिल 1970 18 मार्च 1972 ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
18 मार्च 1972 21 नोव्हेंबर 1976
22 नोव्हेंबर 1976 3 मार्च 1978 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
डार्विन डियेंगडोह पग 10 मार्च 1978 6 मे 1979 ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
बी.बी. लिंगडोह 7 मे 1979 7 मे 1981
(१) विल्यमसन ए. संगमा 7 मे 1981 24 फेब्रुवारी 1983 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(३) बी.बी. लिंगडोह 2 मार्च 1983 31 मार्च 1983 ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स
(१) विल्यमसन ए. संगमा 2 एप्रिल 1983 5 फेब्रुवारी 1988 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पी.ए. संगमा 6 फेब्रुवारी 1988 25 मार्च 1990
(३) बी.बी. लिंगडोह 26 मार्च 1990 10 ऑक्टोबर 1991 हिल पीपल्स युनियन
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
11 ऑक्टोबर 1991 5 फेब्रुवारी 1992 -
डी.डी. लपांग 5 फेब्रुवारी 1992 19 फेब्रुवारी 1993 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
एस.सी. मारक 19 फेब्रुवारी 1993 27 फेब्रुवारी 1998
27 फेब्रुवारी 1998 10 मार्च 1998
(३) बी.बी. लिंगडोह 10 मार्च 1998 8 मार्च 2000 युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी
इ.के. मावलोंग 8 मार्च 2000 8 डिसेंबर 2001
फ्लिंडर अँडरसन खोंगलाम 8 डिसेंबर 2001 4 मार्च 2003 अपक्ष
(५) डी.डी. लपांग 4 मार्च 2003 15 जून 2006 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जे.डी. रीम्बाई 15 जून 2006 10 मार्च 2007
(५) डी.डी. लपांग 10 मार्च 2007 4 मार्च 2008
4 मार्च 2008 19 मार्च 2008
१० डोनकुपर रॉय 19 मार्च 2008 18 मार्च 2009 युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी
रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
18 मार्च 2009 12 मे 2009
(५) डी.डी. लपांग 13 मे 2009 19 एप्रिल 2010 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ मुकुल संगमा 20 एप्रिल 2010 5 मार्च 2013
5 मार्च 2013 6 मार्च 2018
१२ कॉनराड संगमा 6 मार्च 2018 विद्यमान नॅशनल पीपल्स पार्टी

संदर्भ

[संपादन]