अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले)
अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) | |
---|---|
आयुष्य | |
जन्म | १८८८ |
मृत्यू | ११ फेब्रुवारी १९५३ |
संगीत साधना | |
गायन प्रकार | हिंदुस्तानी गायन |
उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) (१८८८-१९५३) हे भेंडीबाजार घराण्याचे हिंदुस्तानी गायक होते. लता मंगेशकर मुंबईतील वास्तव्यादरम्यान यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकल्या.
अमान अली खॉं हे उत्तर प्रदेशातून येऊन मुंबईत भेंडीबाजार येथे स्थायिक झालेले छज्जू खॉं यांचे सुपुत्र होते. हे छज्जू खॉं भेंडीबाजार घराण्याच्या अनेक संस्थापकांपैकी एक होते.
म्हैसूरच्या दरबारातील गायक कलानिधी बिदाराम कृष्णप्पा यांच्याकडून अमान अली खॉं यांनी कर्नाटक पद्धतीचे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.. त्यांचा उपयोग करून अमान अली खॉं यांनी भेंडीबाजार घराण्याच्या गायकीत लयकारी आणि सरगम आणली.
अमान अली खॉं यांनी १९४७ साली मुंबई सोडली आणि ते पुण्यात राहू लागले. त्यांच्या दिल्लीच्या भेटीत त्यांना न्युमोनिया झाला आणि त्यांतच त्यांचा ११ फेब्रुवारी १९५३ रोजी अंत झाला.
अमान अली खॉंष यांचे नामवंत शिष्य
[संपादन]वसंतराव देशपांडे, टी.डी. जानोरीकर, मुहम्मद हुसेन खॉं, मन्ना डे, लता मंगेशकर, निसार बाझमी, वली अहमद खॉं, बी.चैतन्य देव आणि पेटीवादक शांतीलाल.
पुस्तक
[संपादन]अमान अली खॉं यांच्या बंदिशींचे 'अमर बंदिशे' नावाचे पुस्तक आणि सीडी प्रकाशित झाली आहे. (प्रकाशन दिनांक २३ नोव्हेंबर २०१७)