शौनक अभिषेकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शौनक अभिषेकी

शौनक अभिषेकी
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मंगेशी[गोवा]
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील जितेंद्र अभिषेकी
नातेवाईक दीनानाथ मंगेशकर चुलत आजोबा,लता,आशा,मीना,उषा आत्या व हृदयनाथ काका.
संगीत साधना
गायन प्रकार हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, अभंग,
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

शौनक अभिषेकी हिंदुस्तानी शास्त्रीय गायक आणि संगीतकार आहेत. दिवंगत शास्त्रीय गायक पं जितेंद्र अभिषेकी यांचे शौनक हे पुत्र आहेत. लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत. शौनक अभिषेकी म्हणतात, "संगीतातल्या साक्षात सरस्वती म्हणजे लतादिदी. जन्मोजन्मी रीयाज केल्यावर जो सूर मिळतो तो दिदींना नैसर्गिकरीत्या मिळालाय. आम्ही प्रचंड रियाज आणि साधना करून जे मिळवायचा प्रयत्‍न करतो ती देणगी दिदींच्या ठायी निसर्गदत्तच आहे. साधना करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या सुरांमधल्या भावांचा अभ्यास करावा.

"माझं त्यांच्याशी दुहेरी नातं आहे. मी त्यांचं भक्त तर आहेच पण शिवाय त्या माझ्या आत्यादेखील आहेत. ज्या घरात लता मंगेशकर, जितेंद्र अभिषेकी सारखी माणसं जन्मली त्या घरात माझा जन्म झाला हे मी माझे भाग्यच समजतो."

शौनक अभिषेकी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • संगीतातील योगदानाबद्दल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने वै.ह.भ.प. विश्वनाथ महाराज इंगळे यांच्या स्मृत्रीत्यर्थ दिला जाणारा वैष्णव पुरस्कार