बोधगया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोधगया
भारतामधील शहर

महाबोधी मंदिर
बोधगया is located in बिहार
बोधगया
बोधगया
बोधगयाचे बिहारमधील स्थान

गुणक: 24°41′42″N 84°59′29″E / 24.69500°N 84.99139°E / 24.69500; 84.99139

देश भारत ध्वज भारत
राज्य बिहार
जिल्हा गया जिल्हा
क्षेत्रफळ २४९ चौ. किमी (९६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट (१२ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ३८,४३४
  - घनता १५० /चौ. किमी (३९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


बोधगया हे भारत देशाच्या बिहार राज्यामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या बोधगया येथील महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील बोधी वृक्षाखाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती असे मानण्यात येते. बोधगया, कुशीनगर, लुंबिनीसारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

२००२ साली महाबोधी मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थाने ह्या यादीमध्ये स्थान मिळाले. बोधगयेला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी गया विमानतळावर अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या सेवा पुरवतात.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

विकिव्हॉयेज वरील बोधगया पर्यटन गाईड (इंग्रजी)