ज्योत्स्ना हर्डीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योत्स्ना हर्डीकर
टोपणनावे ज्योत , ज्योत्स्ना
आयुष्य
जन्म ९ जानेवारी १९५१
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मुंबई
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

ज्योत्स्ना हर्डीकर (जन्मदिनांक ९ जानेवारी - हयात) या लोकप्रिय हिंदुस्तानी गायिका आहेत

पूर्वायुष्य[संपादन]

गायिका ज्योत्स्ना हर्डीकर या पूर्वाश्रमीच्या ज्योती श्रीखंडे. जन्म ९/१/१९५२. मूळच्या पुण्याच्या. घरचे वातावरण संगीताला पोषक होते.आईवडील दोघांनाही संगीताची अतिशय आवड होती. या अगदी लहानपणापासून गाणी गात, असे घरचे सांगतात. पण शास्त्रीय संगीत शिक्षणाची सुरुवात दहाव्या वर्षी इंगळेबुवांच्या क्लासमध्ये झाली. गांधर्व महाविद्यालयातच्या पहिल्या चार परीक्षा तिथूनच दिल्या. नववीत श्री वाडीकरबुवांकडे शिकायला सुरुवात केली. तेव्हा पाचवी परीक्षा म्हणजे विशारद होती,पण गुरुजी परीक्षेसाठी शिकवणार नव्हते.म्हणून परीक्षा दिली नाही.माँडर्न हायस्कूल (पी.ई.एस्.गर्ल्स हायस्कूल) आणि फर्ग्युसन काँलेजमध्ये शिक्षण झाले. बी.ए.अर्थशास्त्र ही पदवी घेतली.

 शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली, .आंतरशालेय शास्त्रीय संगीताचं बखले पारितोषिक   १९६५/६६मध्ये मिळाले.
 काँलेजमध्ये असताना १९७० साली फिल्म इंस्टिट्यूटमध्ये श्री भास्कर चंदावरकरांची दोन गाणी गाण्यासाठी बोलावले गेले. ते पहिले रेकॉर्डिंग..
 १९७० च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी NCCतर्फे दिल्लीला जाण्यासाठी निवड करण्यात आली.
 १९७१मध्ये आंतरमहाविद्यालयीन शास्त्रीय संगीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले.. हिराबाई बडोदेकर यांच्या हस्ते!
 १९७२मध्ये आंतरमहाविद्यालयीन नाट्यगीत गायनात दुसरं पारितोषिक मिळाले..भीमसेन जोशींच्या हस्ते!
 हे यांच्या आयुष्यातले भाग्ययोगच आहेत.
 १९७२ च्या प्रजासत्ताक दिनी भारतातील सर्व युनिव्हर्सिटींतून निवडक मुलेमुली दिल्लीला पाठवली गेली. त्यातही ज्योत्स्ना हर्डीकर ह्यांचा समावेश करण्यात आला होता.

त्याच वर्षी १९७२ला लग्न करून मुंबईला आल्या. पती अरुण हर्डीकर. लग्नानंतर नाव सौ.ज्योत्स्ना हर्डीकर नावाने कारकीर्द सुरू केली. मुंबईत श्री वसंतराव कुलकर्णींकडे शास्त्रीय संगीत शिक्षण घेतले. शिवाय श्री यशवंत देव आणि श्री श्रीनिवास खळे यांच्याकडे सुगम संगीत शिकल्या. श्री कृष्णराव चोणकर यांच्याकडे नाट्यसंगीत शिकल्या. १९७३ साली पुण्यात झालेल्या बालगंधर्व नाट्यगीत गायनस्पर्धेत पाचवे पारितोषिक मिळाले.

१९७३ भक्तिगीत स्पर्धा (मुंबई) दुसरे पारितोषिक मिळाले.

१९७३/७४ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत 'मदनाची मंजिरी'नाटकात उत्तम गायनासाठी पारितोषिक मिळाले. १९६९ धुळे येथे शास्त्रीय गायनाची बैठक. १९७२ बुलढाणा येथे शास्त्रीय गायनाची बैठक. १९७२ विलेपार्ले म्यूजिक सर्कल येथे शास्त्रीय गायनाची बैठक. १९७२ विलेपार्ले कऱ्हाडे ब्राह्मण संघात शास्त्रीय गायनाची बैठक. १९७२ हैदराबाद येथे शास्त्रीय गायनाची बैठक. १९७३ पुणे येथे शास्त्रीय गायनाची बैठक. १९७४ मुंबई येथे शास्त्रीय गायनाची बैठक.

 याव्यतिरिक्त मुंबई पुणे,नाशिक, इंदूर, निपाणी, हैदराबाद,गोवा दिल्ली, नागपूर,अलिबाग,सांगली बंगलोर, अक्कलकोट अशा अनेक ठिकाणी सुगमसंगीताचे अनेक कार्यक्रम केले.

नैरोबी आणि दारेसलामचा दौरा केला. २००१मध्ये गोव्यात सुगमसंगीताची मैफल केली. २००४मध्ये अलिबाग येथे सुगमसंगीताचा कार्यक्रम केला. अनेक स्पर्धांना परीक्षक म्हणून काम केले.

झी अल्फाच्या 'सारेगम'स्पर्धेत परीक्षक

१९७८/७९ मध्ये श्री उपाध्ये यांच्या "सुधीर फडके रजनी"त मुख्य गायिका म्हणून सहभाग.

 स्वतःचा "स्वरज्योत्स्ना"कार्यक्रम अनेक ठिकाणी सादर.केला.
 १९८५ साली 'हे गीत भावनांचे' हा एका नवीन संकल्पनेचा कार्यक्रम सादर केला गेला.त्यात आधीच रेकॉर्ड केलेल्या(track) संगीताच्या साथीने गायक गाणी सादर करायचे.तोपर्यंत हे तंत्र प्रचलित नव्हते.या कार्यक्रमातही सहभाग होता..
 मुंबईत प्रथमच मराठी भावगीत आणा गुजराती सुगम संगीत एकाच मंचावर सादर केले.त्यात ह्रदयनाथ मंगेशकर,गौरांग व्यास,कमलेश अवस्थी यांच्याबरोबर गाण्याचा मान मिळाला.
 १९९५ मध्ये लंडन येथे दोन स्वतंत्र कार्यक्रम सादर केले.
 १९८७ ते २००० या कालखंडात भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला.८७साली त्यांनी सर्वप्रथम कोरसला साथीदार म्हणून सर्व ठिकाणी न्यायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर देश,विदेशी जाऊन अनेक संस्मरणीय,ऐतिहासिक क्षण अनुभवता आले.
 त्याच कार्यक्रमात भव्य व्यासपीठावर सुरेश वाडकर, मोहम्मद अज़ीज़,आदिनाथ मंगेशकर यांच्यासोबत युगलगीतं सादर केली. हॉलंडला उषाताई मंगेशकरांबरोबर युगलगीतं गाण्याची संधी मिळाली.
 २०००साली लताबाईंच्या कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्यनिमित्ताने नागपूरला एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात विविध संगीतकारांची लताबाईंनी गायिलेली गाणी गाण्यासाठी मुख्य गायिका म्हणून आमंत्रित करण्यात आले..
  २००७/०८मध्ये अमेरिकेचा दौरा केला. दहा कार्यक्रम केले.
 १९८१मध्ये 'संत तुकाराम'या नाटकात संत सखूची भूमिका केली.
 मराठीत अनिल मोहिले, ह्रदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की,स्नेहल भाटकर, मधु आनंद, के. सिकंदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाणी गायली.
 हिंदीत रवींद्र जैन, ख़य्याम, चित्रगुप्त,भूपेन हजारिका,उषा खन्ना, नदीम श्रवण,अन्नू मलिक,इस्माईल दरबार, आनंद मिलिंद, राहुल देव बर्मन यांच्याकडे काम केले.
 जाहिरात क्षेत्रात शंकर महादेवन्,सुनील कौशिक, राजू सिंग,पीयूष तौफिक,शारंगदेव,लुई बँक्स,अशोक पत्की यांच्याकडे काम केले.अनेक अल्बम्स,ध्वनिफितींमध्ये बंगाली, गुजराती, तेलुगु, तमिळ,कन्नड, मल्याळमसारख्या अनेक भाषांमध्ये गायन केले. 
 संस्कृतमध्ये शारदास्तवन.
१९९०/९१मध्ये  व्हीनस रेकॉर्ड कंपनीने '41 Non stop'नावाने गुजराती लोकगीतांची रेकॉर्ड केली. त्यात बाकी सर्व गुजराती गायक गायिका होत्या. फक्त ज्योत्स्ना एकमेव मराठी गायिका होती. या रेकॉर्डचा विक्रमी खप झाला.

सूत्रधार (हिंदी) सिनेमापासून पाश्वगायनाला सुरुवात.

सांगीतिक कारकीर्द[संपादन]

पार्श्वगायन... १९८५ धूमधडाका १९८७ खट्याळ सासू नाठाळ सून

१९८७  दे दणादण
१९८८  गुनाहोंकी शतरंज(हिंदी)

१९८८ घोळात घोळ १९८८ मज्जाच मज्जा १९८९ मालमसाला १९८९ गावरान गंगू १९८९ हमाल दे धमाल १९८९ फेकाफेकी १९८९ निवडुंग १९८९ थरथराट १९८९ नवराबायको

१९८९  सती तोरल(गुजराती)

१९८९ चंबू गबाळे १९८९ राजानं वाजवला बाजा १९८९ लपवाछपवी १९८९ मिठूमिठू पोपट १९९० कुठं कुठं शोधू मी तुला १९९० दे धडक बेधडक १९९० अफलातून १९९० धडाकेबाज १९९१ माहेरची साडी १९९१ बंडलबाज १९९१ बंधन १९९१ डॉक्टर डॉक्टर १९९१ धरलं तर चावतंय् १९९१ एक रात्र मंतरलेली १९९२ जगावेगळी पैज १९९२ वाजवा रे वाजवा १९९२ जिवलगा १९९२ अनुराधा

१९९३  लपंडाव

१९९४ लाडला(हिंदी) १९९४ आक्का १९९५ संत नामदेव १९९४ रामरहीम

१९९७  साज़ (हिंदी)

१९९९ हम दिल दे चुके सनम

  *प्रदर्शनाची तारीख माहीत नसलेले चित्रपट*

सूत्रधार (हिंदी)पहिले पार्श्वगायन निराली हम तुम और घोस्ट अपणा अपणा जोग लेडीज टेलर टक्कर लग्नाचा गोंधळ करायचं ते दणक्यात सुना येती घरा जीव तुझ्यावर जडला अनेक अल्बम्स,ध्वनिफितींमध्ये अनेक भाषांमध्ये गायन केले. त्यापैकी बंगाली, गुजराती, तेलुगु, तमिळ,कन्नड, मल्याळम मध्ये गाणी गायली. संस्कृतमध्ये शारदास्तवन.

१९९०/९१ मध्ये  व्हीनस रेकॉर्ड कंपनीने '41 Non stop'नावाने गुजराती लोकगीतांची रेकॉर्ड केली.त्यात बाकी सर्व गुजराती गायक गायिका होत्या.फक्त ज्योत्स्ना एकमेव मराठी गायिका होती.या रेकॉर्डचा विक्रमी खप झाला.
  • ध्वनिफिती, रेकाॅर्ड्‌स, अल्बम्स

१९८४ मंतरलेले सूर HMV 0१९८७ हरे रामा हरे क्रुष्णा Oriental १९९० मैफल प्रथमेश ऑडिओ. १९९० आशिकी (गुजराती)T series

          फुरफुर घोडा. CBS

. कुठं कुठं येऊ CBS १९९५ नॉनस्टॉप दांडिया Venus

१९९५  ढोलिडा ढोल रे वगाड(गुजराती) Venus
      पिकनिक सॉंग्स  Ultra cassettes
    आत्मा(हिंदी).  हरिहरन, लेस्ली
    जय श्री रामकथा(हिंदी)  Venus
    शिरडीके देवता (हिंदी) Venus
    शिरडीके महाराज(हिंदी) Venus
   श्रावणी मी (मराठी भावगीत)Compact disc

श्री शृंगेरी पीठ चैतन्यम् (संस्कृत) सच्चिदानंद कॅसेटस्

×2405:204:38E:7ED:0:0:64A:50B1×2405:204:38E:7ED:0:0:64A:50B1×2405:204:38E:7ED:0:0:64A:50B1×2405:204:38E:7ED:0:0:64A:50B1×

संगीत ध्वनिमुद्रिका[संपादन]

पुरस्कार व सन्मान[संपादन]