वेलिंग्टन पियर (मुंबई)
Appearance
अपोलो बंदर (सध्याचे नाव-वेलिंग्टन पियर) हे १९व्या शतकात, मालवाहतूक तसेच प्रवाश्यांची वाहतूक करणारे मुंबईमधील एक महत्त्वाचे बंदर होते. गेटवे ऑफ इंडिया येथेच बांधण्यात आलेले आहे.सध्या, एलिफंटा आयलंड येथे नावेतून जाण्यास या ठिकाणाचा वापर करण्यात येतो.
याचे मूळ नाव 'पल्ला' या माशांवरुन पडले ज्याची येथे फार पूर्वी विक्री होत असे. पोर्तुगिजांनी त्याचा अपभ्रंश 'पोल्लम' असा केला तर इंग्रजांनी 'अपोलो'. अशी आख्यायिका आहे. 'वेलिंग्टन पियर' या सध्याचे नावाऐवजी 'अपोलो बंदर' हे नाव अद्यापही स्थानिक लोकांत वापरल्या जाते कारण ते प्रचलित आहे.