Jump to content

मासा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मासा हा पाण्यात राहणारा जलचर प्राणी आहे. मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. ती कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी

खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून अ व ड जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा (हवेच्या पिशव्यांचा) विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत.मासे आहारात असणे चांगले आहे.

माशांध्ये गोड्या पाण्याचे मासे, खाऱ्या पाण्यातले मासे आणि दॊन्ही पाण्याचा संयोग होतो अशा नदीच्या मुखातील मासे असे प्रमुख प्रकार आहेत.


डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरियाचे) निर्मूलन करण्याच्या कामी गॅम्‍ब्‍यूझसारख्या (गप्पी) माशांचा फार उपयोग होतो. काही मासे नारूसारख्या रोगाचा प्रतिबंध करण्यास उपयोगी पडतात. काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून तर काही पाण्यातील प्रदूषण शोधून काढण्यास उपयुक्त ठरतात.

ज्या माशांच्या जातीचे सहज प्रजनन होऊ शकते व जे आकारमानाने लहान पण रंगदार व दिसण्यात आकर्षक असतात असे गोड्या पाण्यातील मासे काचेच्या जलजीवपात्रात ठेवून घराची शोभा वाढविणे व मनोरंजन करणे हाही जगातील लक्षावधी लोकांचा व्यवसाय आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत या व्यवसायात अंदाजे पन्नास लक्ष लोक गुंतलेले असावेत. चीन, जपान व इतर दक्षिण आशियातील राष्ट्रांतही हा एक आवडीचा छंद मानला जातो.मुंबईत अनेक लोकांच्या घरी माशांची जलजीवपात्रे आढळतात. मुंबईतील तारापोरवाला जलजीवालय प्रसिद्ध आहे.[⟶ जलजीवालय].

पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हाही प्रकार जगात सर्वत्र आढळतो. या प्रकाराने काही गोरगरीब चरितार्थासाठी मासे पकडतात, तर काही छंद म्हणून हौसेने मासेमारी करतात. या कामासाठी लागणारी उपकरणे अत्यंत साधी व गरिबांच्या आवाक्यात असलेली असू शकतात, तर काही किंमती असतात. किंमती उपकरणे तयार करण्याचे कारखाने बऱ्याच विकसित देशांत आहेत. हा छंद असलेले, निरनिराळ्या सामाजिक वा आर्थिक स्तरांतले लाखो लोक जगात आहेत. काही मासे शिकारी मासे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सहजगत्या गळास लागत नाहीत. काही वेळा बंदुकीने त्यांची शिकार केली जाते.[⟶ मत्स्यपारध].

मासाच्या दृष्टिनुसार माणूस हे त्याच्यासाठी पौष्टिक अन्न आहे.म्हणून मासे हे माणसाला खातात.आणि मासे हे माणूस तावडीत सापडल्यावर त्याला मारून खाल्याझाल्याशिवाय सोडत नाही. माशा हा प्रामाणिक जीव आहे त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे.मासा मारून खाण्यापेक्षा त्यांना मारून खाणाऱ्या माणसाला मारून खाणे पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त आवश्यक आहे.मासे हे निसर्गाचे अनमोल सोबती आहेत.

पिरान्हामासा

शरीररचना

[संपादन]

माशांचे शरीर साधारणपणे लांबट, दोन्ही टोकांस निमुळते व प्रवाहरेखित म्हणजे पाण्यात फिरताना कमीतकमी प्रतिरोधी असे असते. माशाच्या शरीराचे मस्तक (डोके), धड व पुच्छ (शेपटी) असे तून भाग पडतात. पुच्छाच्या टोकास पुच्छपक्ष असतो. मस्तक किंवा डोक्याच्या पुढच्या टोकास जबडा, वर नासाद्वारांची (नाकपुड्यांची) जोडी आणि दोन्ही बाजूंस लकाकणारे पाणीदार डोळे असतात. डोक्याच्या पश्चभागी दोन्ही बाजूंस, वर प्रच्छद असलेले क्लोमकक्ष (कल्ल्यांचे कप्पे) असतात. या कक्षांत लालबुंद क्लोम असतात. यांच्याद्वारेच मासे पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनाचे शोषण करून श्वसन करतात. हे माशांचे वैशिष्ट्यपूर्ण इंद्रिय आहे [⟶ क्लोम]. प्रच्छदाच्या पश्च कडेपर्यंत डोक्याची लांबी मानली जाते. या दोन्ही क्लोमकक्षांच्या मध्यभागात शरीरांतर्गत हृदय असते. डोक्याच्या पुढच्या मध्यभागात हाडांच्या कवटीत लांबटसा मेंदू असतो. पृष्ठवंशी प्राण्यांच्या मेंदूच्या कवटीस जोडून निरनिराळ्या मणक्यांचा बनलेला पृष्ठवंश (पाठीचा कणा) पुच्छभागापर्यंत जातो व त्यात असणाऱ्या मेरु नालेतून मेंदूपासून निघणारा मेरुरज्जू पुच्छापर्यंत जातो. प्रच्छदाच्या दोन्ही बाजूंस वरच्या भागात हाडांच्या बंदिस्त पोकळीत श्रवणेंद्रिये असतात. माशांना बाह्यकर्ण नसतो. त्यांच्या शरीरावर निरनिराळ्या भागांत पक्ष असतात. पाठीवर एक किंवा कधीकधी दोन पृष्ठपक्ष, खांद्याच्या भागात प्रत्येक बाजूस एक अशी अंसपक्षांची जोडी, खाली पोटाजवळ श्रोणिपक्षांची जोडी, धडाच्या शेवटी मध्यस्थ असा गुदपक्ष व पुच्छ भागात पुच्छपक्ष अशी ही निरनिराळ्या पक्षांची रचना असते. श्रोणिपक्षामागे अधर मध्यभागी गुदद्वार व जननरंध्र असते. धडाच्या देहगुहेत (शरीराच्या पोकळीत) जठर, आतडे वगैरे पचन तंत्राचे (पचन संस्थेचे) भाग, हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड), जनन ग्रंथी इ. शरीराचे महत्त्वाचे अवयव सामाविलेले असतात.

शार्क मासा

जीवनवृत्त

[संपादन]
मासे अनेक प्रकार व आकारात पाहण्यास मिळतात. हे चित्र ड्रॅगन हॉर्स नामक माशाचे आहे. हा मासा सी हॉर्स नावाच्या माशाचा जवळ जाणारा आहे. याच्या कल्ल्यांच्या पानासारख्या रूपामुळे हा पाणवनस्पतींमध्ये चटकन दिसत नाही.

माशांचे जीवनवृत्त सर्वसाधारणपणे पाण्यातील एकंदर परिस्थितीशी जुळणारे असते. ही परिस्थिती विविध प्रकारची असल्यामुळे जीवनवृत्तातही विविधता आढळते. माशांना बाह्य जननेंद्रिये नसतात. मादी पाण्यात अंडी सोडते व त्याच वेळी तिच्याजवळ असणारा नर अंड्यावर शुक्राणूंचा (पु-जनन पेशींचा) वर्षाव करतो. अंड्याचे निषेचन (फलन) व पुढील विकास पाण्यातच होतो. अंड्यातून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगाणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर येण्यास अठरा तासांपासून काही आठवड्यांचा अवधी लागतो. किती अवधी लागावा हे त्या जातीवर व तापमान वगैरेंसारख्या भोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते.डिंभाचे रूपांतरण प्रौढात होते. यास लागणारा कालही माशाच्या जातीवर अवलंबून असतो. पुष्कळ माशांत थोडे दिवस पुरतात, तर ईल या माशास ३ किंवा ४ वर्षे व लॅंप्री या माशास पाच वर्षे लागतात. साधारणपणे अंडी निषेचित झाल्यावर तो इतस्ततः वाहत जात असतानाच वाढत असतात व शेवटी डिंभ बाहेर पडतो. स्टिकलबॅक, गुरामी, सयामी फायटर, शिंगाडा इ. माशांत नर किंवा मादी अंड्याची किंवा पिलांची काळजी घेतात. पिसिलीडी व इतर काही मत्स्यकुलांत अंड्याचे निषेचन व गर्भाची वाढ मादीच्या शरीरातच होते व ही मादी अंडी न घालताच पिलांना जन्म देते. या माशांत बाह्य जननेंद्रियेही आढळतात. मुशी, वागळी, पाकट इ. उपास्थिमिनांतही ( ज्यांचा सांगाडा कूर्चेचा बनलेला असतो अशा माशांतही) अशीच प्रजनन व्यवस्था असते. काही माशांत अंड्यांचे निषेचन मादीच्या शरीरात होते व पुढची वाढ बाहेर पाण्यात होते. काही थोड्याजाती

उभयलिंगी आहेत; परंतु त्यांच्यातील पुं-जनन तंत्र (नरांतील जनन संस्था) व स्त्री-जनन तंत्र निरनिराळ्या वेळी पक्व होतात.

काही जाती डिंभावस्थेपासून काही महिन्यांतच प्रौढावस्थेत येऊन प्रजनन करू लागतात, तर काही माशांत हा काळ ४-५ वर्षांपेक्षाही जास्त असतो. वाम माशास प्रौढावस्थेत येण्यास बारा वर्षे लागतात. माशांचे आयुष्यही एकदोन वर्षांपासून काही जातीत २० ते ३० वर्षांपर्यंत असू शकते. कार्प मासा ५० वर्षेही जगतो असे म्हणतात.

स्थलांतर

[संपादन]

माशांचे स्थलांतर हा त्यांच्या हालचालीचाच एक प्रकार आहे. दूरवरच्या नवीन पर्यावरणात मोठ्या संख्येने जाण्याच्या क्रियेस स्थलांतर म्हणता येईल. स्थलांतराचा हेतू प्रजनन, अन्नार्जन किंवा प्रतिकूल परिस्थितीतून सुटका हा असू शकेल. प्रजननासाठी होणाऱ्या स्थलांतराचे निरनिराळे प्रकार आहेत. पाला (हिल्सा), शॅड किंवा सामन यांसारखे मासे समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून नद्यांच्या गोड्या पाण्यात येतात; तर अमेरिकन व यूरोपियन ईल नद्यांतून निघून समुद्रात शिरतात व हजारो किलोमीटर दूरवर जातात. खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशास समुद्रापगामी (ॲनाड्रोमस) मासे व गोड्या पाण्यातून खाऱ्या पाण्यात स्थलांतर करणाऱ्या माशांस समुद्रगामी (कॅटोड्रोमस) मासे असे म्हणतात. पॅसिफिक सामनचे स्थलांतर फार चित्तथरारक आहे. या माशांची वाढ चार वर्षे समुद्रात होते व अंडी घालण्याची वेळ आली की, ते मोठ्या संख्येने नदीच्या पाण्यात त्यांच्या जन्मस्थानाकडे म्हणजे ज्या लहान ओढ्यात त्यांचा जन्म झाला असेल तेथे स्थलांतर करू लागतात. या काळात नर व मादी काही खात नाहीत व कुठेही थांबत नाहीत. वाटेत येणाऱ्या अडचणींवर मात करून लहानलहान धरणांरून उड्या मारून ते आपले उद्दिष्ट गाठतात. इष्टस्थळी पोहोचल्यावर उथळ पण स्वच्छ अशा गोड्या पाण्याच्या प्रवाहात ते आपल्या तोंडांनी खड्डे करतात. याला आपण घरटे म्हणू शकतो. या खड्ड्यात अगर घरट्यात मादी अंडी घालते व नर ती निषेचित करतो. नंतर ते दोघे तिथल्याच गोलसर गोट्यांनी ते खड्डे बुजवितात. सामनच्या काही जातींतील नर व मादी परत समुद्रात जातात; परंतु‘सॉक आय’किंवा किंग सामनच्या नर व मादी घरटेवजा खच्चे बुजविण्याचे शेवटचे कार्य संपले की,मरून जातात. २५−३० दिवसांनी अंड्यांतून डिंभ बाहेर येतात व तेथील पाण्यातील सूक्ष्म जीवजंतूंवर आपली गुजराण ४−६ महिन्यांपर्यंत करतात. नंतर ज्या मार्गाने त्यांचे मातापितर आले त्या मार्गानेच समुद्राकडे स्थलांतर करतात. तेथे ४−६ वर्षे राहून मोठे झाल्यावर परत नदीकडे विणावळीसाठी येतात, अंडी घालतात व मरून जातात.

यूरोपियन ईल या माशांचे स्थलांतर समुद्रगामी आहे. यूरोपातील नद्या सोडून हे मासे अटलांटिक महासागरातील ४,८०० किमी.चा खाऱ्यापाण्यातील प्रवास करून सारगॅसी समुद्रात येतात. हा समुद्र उत्तर अटलांटिक प्रदेशात वेस्ट इंडीज बेटांच्या ईशान्येकडे आहे व येथील पाणी थोडेसे उष्ण व संथ आहे. या पाण्यात ईल मासे अंडी घालतात. ती निषेचित झाल्यावर लेप्योसेफॅलस स्वरूपातील डिंभ बाहेर येतात. मग हे डिंभ गल्फ स्ट्रीमच्या पाण्यात वाढतात व त्या प्रवाहाबरोबर परंतु न चुकता परत ज्या देशातून त्यांचे जनक आले त्या देशात परत जातात. [⟶ प्राण्यांचे स्थलांतर].

तारली (सार्र्डिन), हेरिंग व बांगडे (मॅकेरेल) यांचे मोठाले थवेही स्थलांतर करताना आढळले आहे. यांच्या हालचालींवरून हे स्थलांतर अन्नार्जन किंवा जनन याकरिता असावे असे वाटते.

माशांचे प्रकार

[संपादन]

कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्‍य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा ८५% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.

पावसात खाडीकिनाऱ्यावर शिंगाली माशांसारखे दिसणारे, मात्र त्यापेक्षा आकारने लहान असणारे तीन काटय़ांचे म्हणजेच चिवनी मासा म्हणतात. हा मासा तेलकट असल्यामुळे तो हातात धरताच सटकतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात.पावसाळ्याच्या सुरुवातीला हजारोंच्या संख्येने हे मासे किनाऱ्यावर येतात. यांनाच शिंगळा शिंगटे किंवा शिंगाडा म्हणतात.

माशांच्या प्रकारांमधील पापलेट, रावस, सुरमई, बांगडा, सौंदाळे, हलवा, घोळ इ. मोठे आणि कमी काटे असलेले मासे. छोटय़ा आणि काटेरी माशांमध्ये करली, भिंगी, पाला (हे तिन्ही मोठे, पण भरपूर काटे असलेले मासे आहेत) तर मांदेली, मोदकं, बोंबील, कांटा, तारली, मुडदुसे, टोकेरी सुळे, बोयटं, पेडवे, निवटे (निवटी), शिंगाडा इत्यादी अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. मोरी / मुशी (शार्कची जात) या माशाला काटे नसून केवळ मध्यभागी मणका असतो, हा पथ्याचा मासा म्हणून बिनधोकपणे खाल्ला जातो.

पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा यांची सर्वसाधारणपणे मोठ्या माशांमध्ये गणना होते. तर सौंदाळे, मुडदुशी (नगली), बोंबील, मांदेली, वेरल्या, शेवटे, धोडय़ारे असे मासे छोट्या माशांमध्ये मोडतात. याशिवाय कुरल्या, तिसऱ्या, खडपी कालवे, कोलंबी अशा प्रकारचे मासेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. त्यापकी प्रत्येक माशाचे स्वतःचे गुणधर्म असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खोल समुद्रात (म्हणजे किनाऱ्यापासून दूर असलेल्या समुद्रात) मिळणारे मोठे मासे (डीप सी फिश) हे सर्वसाधारणपणे अधिक बल देणारे अर्थात् बल्य असतात. उदा. रावस, हलवा, सुरमई. परंतु हे मासे पचायला जड असतात,

मंगुर, कोलबी, तेलप्पा, पात्या, चिचे, मळे, चिंगल्या किंवा कळवाल्या अशा प्रकारचे गावठी मासे महाराष्ट्रातले आदिवासी विकतात.

मासांच्या प्रकार नाव [१]
मराठी इंग्रजी चित्र
पापलेट Pomfret
बांगडा Indian Mackerel
रावस Salmon Indian
वाम Eel
सुरमई Indo-Pacific king mackerel
हलवा Black pomfret
कुपा (Yellowfin Tuna)
करंदी, करली (Silver Barfish)
तारली पेडवा Indian Oil Sardine
घोळ
तांबोशी Red Snapper
तलवार मासा Sword fish
मांदेली GOLDEN ANCHOVY
पाला ,भिंग Ilish
मुडदुशी , नगली Lady Fish / Muddoshi / Nogli / Kane
कातला
रोहु मासा
बोंबील Bombay Duck
राणीमासा Pink Perch,Finned Bulleye
लेपा Sole Fish
मरळ
सौंदाळे
वेरल्या
खवली
शिंगाडा मासा Cat Fish

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "जैवविविधता - मासे". १८ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.