माहिम खाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माहीमची खाडी या पानावरून पुनर्निर्देशित)
माहीमची खाडी

माहीमची खाडी ही मुंबई शहरातील अरबी समुद्रावरील खाडी आहे. मुंबईमधून वाहणारी मिठी नदी या खाडीद्वारे माहीमजवळ समुद्रास मिळते. ही खाडी खारफुटींची झाुडपाांनी (स्थानिक भाषेत-तिवटाच्या झाडांनी) वेढलेली आहे. धारावीच्या वसाहतीतून येणारे सांडपाणी खाडीत सोडल्याने खाडी प्रदूषित झाली आहे, आणि त्याचा प्रभाव ह्या खारफुटीवर पडत आहे व ती झाडे नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

इतिहास[संपादन]

माहीम हा मुंबई मधील एक बेट कोळीवाडा आहे. माहीमला आणि वांद्र्याला एकत्र जोडण्यासाठी माहीम कॉजवे (कोळीवाडा) नावाचा एक पूल आहे. हा पूल सन १८४१ आणि १८४६ मध्ये सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी लेडी जीजीभॉय यांच्या नावे लोकांसाठी दान करण्यात आला, त्यावेळी त्याचा खर्च अंदाजे रु १,५७,०००/- इतका आला होता.