भारतातील राजकीय पक्ष
१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ८ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसे व शिवसेना) पक्ष आहेत.
भारतात २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात.भारतीय शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय जनता पक्ष व नॅशनल पीपल्स पार्टी असे फक्त आठ राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.
मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.
राष्ट्रीय पक्ष[संपादन]
मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची यादी
क्रमांक | निवडणूक चिन्ह | ध्वज | पक्ष | संक्षेप | वर्ष[१] | पक्ष नेता |
---|---|---|---|---|---|---|
1. | ![]() |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | INC (काँ) | १८८५ | सोनिया गांधी | |
२. | ![]() |
बहुजन समाज पक्ष | BSP (बसप/बसपा) | १९८४ | मायावती | |
३. | ![]() |
भारतीय कम्युनिस्ट पक्ष | CPI (भाकप) | १९२५ | सुरवरम सुधाकर रेड्डी | |
४. | भारतीय जनता पक्ष | BJP (भाजप’भाजपा) | १९८० | जे पी नड्डा | ||
५. | ![]() |
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष | CPI (M) (मार्क्सवादी) | १९९६ | प्रकाश कारत | |
६. | ![]() |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | NCP (राष्ट्रवादी) | १९९९ | शरद पवार |
राज्यस्तरीय पक्ष[संपादन]
मान्यताप्राप्त राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्षांची यादी
- तमिळ मनिला काँग्रेस
- तेलुगु देशम पक्ष
- हरियाणा विकास पक्ष
- काँग्रेस (समाजवादी)
- पुरोगामी लोकदल
- शेतकरी कामगार पक्ष
- राष्ट्रीय समाज पक्ष
- मणिपूर काँग्रेस पक्ष
- हिमाचल विकास काँग्रेस
- तमिळ मनिला काँग्रेस
- तेलुगू देशम पक्ष
- हरियाणा विकास पक्ष
- बिजू जनता दल
- फॉरवर्ड ब्लॉक
- काँग्रेस (समाजवादी)
- पुरोगामी लोकदल
- शेतकरी कामगार पक्ष
- लोक जनशक्ति पक्ष
- आसाम गण परिषद
- नॅशनल काॅन्फरन्स पक्ष
- झारखंड मुक्ति मोर्चा
- हिमाचल विकास काँग्रेस
- समता पक्ष
- राष्ट्रीय जनता दल
- अखिल भारतीय मुस्लिम लीग
- अखिल भारतीय शेरे हिंद पार्टी
- संत रोहिदास नवपरिवर्तन सेना महाराष्ट्र राज्य
- सुराज्य निर्माण सेना
अन्य माहिती[संपादन]
२०१८ साली,
- देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द होते.
- देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द होता.
- देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द होते.
- देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द होते.
- देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द होता.
- देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द होता.
- देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत होते.
- उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष होते, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
- दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
- बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष होते.
- तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
- ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष होते.
काही 'खास' नावांचे पक्ष :-
- अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
- अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
- अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
- आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
- आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
- आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
- आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
- ऑल इंडिया गांधी काँग्रेस (बंगलोर-कर्नाटक)
- बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
- भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
संदर्भ[संपादन]
- ^ a b "Immigration and Refugee Board of Canada, Country Fact Sheet - India". 2007-05. 2009-08-22 रोजी पाहिले.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)