अखिलेश यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अखिलेश यादव

कार्यकाळ
१५ मार्च २०१२ – ११ मार्च २०१७
मागील मायावती
पुढील योगी आदित्यनाथ

लोकसभा खासदार
कार्यकाळ
२००० – २ मे २०१२
मतदारसंघ कन्नौज

जन्म १ जुलै, १९७३ (1973-07-01) (वय: ४४)
इटावा, उत्तर प्रदेश
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
पत्नी डिंपल यादव
नाते मुलायम सिंग यादव (वडील)
अपत्ये

अखिलेश यादव हा भारत देशातील एक राजकारणी, समाजवादी पक्षाचा पक्षप्रमुख व उत्तर प्रदेश राज्याचा माजी मुख्यमंत्री आहे. मार्च २०१२ ते मार्च २०१७ दरम्यान ह्या पदावर असणारा अखिलेश हा उत्तर प्रदेशचा आजवरचा सर्वात तरूण मुख्यमंत्री आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव ह्यांचा मुलगा असलेला अखिलेश २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर आला. ५ वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिल्यानंतर २०१७ विधानसभा निवडणुकीत अखिलेश व समाजवादी पक्षाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

बाह्य दुवे[संपादन]