Jump to content

भ्रष्टाचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भ्रष्टाचाराविरूद्ध संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन
भ्रष्टाचार
उपवर्गwrongdoing, अपराध, abuse of power संपादन
ह्याचा भागabuse संपादन
Has characteristicevil संपादन
Manifestation ofgovernance failure संपादन
Practiced byفاسد संपादन
Relates to sustainable development goal, target or indicatorTarget 16.5 of the Sustainable Development Goals संपादन
Handled, mitigated, or managed bygovernance संपादन
च्या विरुद्धanti-corruption संपादन

व्याख्या

[संपादन]

भ्रष्ट म्हणजे अधार्मिक, अनीतिमान, अशुद्ध, आसनावरून खाली ओढलेला, खराब, गळालेला, बरबटलेला, बाटलेला, विटाळलेला, वगैरे. असे वर्तन असलेल्या माणसाला भ्रष्ट माणूस म्हणता येईल. त्याचे आचरण म्हणजे भ्रष्टाचार. न्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरीबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचाही समावेश केला आहे. (संदर्भ: भ्रष्टाचार म्हणजे काय? http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=177613:2011-08-19-17-30-14&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3)[मृत दुवा]

भ्रष्टाचाराचा इतिहास

[संपादन]

कर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात केला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणून प्रशासनावर आणि एकूण राजकारणावर संसदेचा अंकुश आणण्यात फिरोज गांधी हे नेते पत्रकार अग्रणी होते.

भ्रष्टाचाराचे समर्थन

[संपादन]

भ्रष्टाचाराचे सहसा उघडउघड समर्थन टाळले जाते. असे असले तरी, सरकारी बाबूवर्ग अपुरा पगार अथवा महागाईचे कारण पुढे करताना आढळू शकतो. "काम न करण्या अथवा न होण्यापेक्षा कुणी मागून घेत असेल तर चुकीचे नाही. ते आपल्याच ...अमुकतमुक... समाजातील माणसांचा आर्थिक विकास झाला तर त्यात काही वावगे नाही, उलट लाच घेणाऱ्या माणसावर टीका करून त्याचे पाय ओढणे कसे चुकीचे आहे" हे सांगितले जाते. तर काही वेळा "त्या पैशातून काही चांगली कामे कशी केली गेली" याचे दाखले दिले जातात. पण अशी समर्थने एका मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाहीत.

माध्यमातील काही विचारवंत "सोईच्या विकासाकरिता भ्रष्टाचार ही अल्पशी किंमत आहे" अशी भलावण करतात. भ्रष्टाचाराचे समर्थन करताना बऱ्याचदा जपानसारख्या विकसित देशाचे उदाहरणसुद्धा दिले जाते.[](संदर्भ १: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=236862:2012-07-09-16-06-05&catid=402:2012-01-20-09-49-01&Itemid=406[मृत दुवा] ,)

आंतरराष्ट्रीय आस्थापनांचे गैरव्यवहार

[संपादन]

इकॉनॉमिक टाइम्स मधील Sagar Malviya & Chaitali Chakravarty, ET Bureau May 28, 2012, 09.39AM IST यांच्या (संदर्भ:http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-28/news/31877166_1_bharti-walmart-kpmg-india-bribes Archived 2013-04-13 at the वेबॅक मशीन. वृत्तानुसार) : The FCPA वेबसाईट म्हणते की, ' ४०० अमेरिकी आस्थापनांनी, परकीय देशांच्या शासकांना, शासकीय अधिकाऱ्यांना अथवा राजकीय पक्षांना लाचखोरीच्या स्वरूपात केलेल्या ३०० मिलियन डॉलर एवढ्या एकूण खर्चाची कारणे संशय घेण्यासारखी(questionable) आहेत'.

भ्रष्टाचार विरोधी कायदे

[संपादन]

भारतीय दंडविधान संहिता १६१

भ्रष्टाचारविरोधी कायदा-१९८८

[संपादन]

भ्रष्टाचाराविरोधी असलेले सर्व कायदे हे सर्वांसाठी लागू करून त्याची कडक अमलबजावणी केली पाहिजे. त्याशिवाय भ्रष्टाचारला आळा बसणार नाही..

  1. "संग्रहित प्रत". 2014-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-09-26 रोजी पाहिले.