झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)
Jump to navigation
Jump to search
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) | |
---|---|
![]() | |
पक्षाध्यक्ष | बाबुलाल मरांडी |
स्थापना | २००६ |
मुख्यालय | हजारीबाग |
लोकसभेमधील जागा | ० / ५४५ |
विधानसभेमधील जागा | २ / ८२ |
राजकीय तत्त्वे | प्रादेशिक |
संकेतस्थळ | jvmp.in |
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) (संक्षेप: जे.व्ही.एम.पी.) हा एक भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. बाबुलाल मरांडी ह्यांनी २००६ साली भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून ह्या पक्षाची स्थापना केली. २०११ साली जमशेदपूर लोकसभा मतदारसंघात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत ह्या पक्षाच्या डॉ. अजय कुमार ह्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला होता.
२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये झाविमोला एकाही जागेवर विजय मिळाला नाही तर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये झाविमोला ८२ पैकी ८ जागांवर विजय मिळवता आला परंतु त्याच्या ६ आमदारांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.