Jump to content

नॅशनल पीपल्स पार्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नॅशनल पीपल्स पार्टी (N. P. P.)
पक्षाध्यक्ष कॉनराड संगमा
लोकसभेमधील पक्षनेता अगाथा संगमा
स्थापना ६ जानेवारी २०१३
संस्थापक पी.ए. संगमा
मुख्यालय शिलाँग, मेघालय
युती राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४५
राज्यसभेमधील जागा
१ / २४५
विधानसभेमधील जागा
२८ / ६०
(मेघालय विधानसभा)
राजकीय तत्त्वे प्रादेशिकवाद
संकेतस्थळ www.nppindia.in

नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party) हा भारतातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे, तरी त्याचा प्रभाव मुख्यत: मेघालय राज्यात केंद्रित आहे. पी.ए. संगमा यांनी जुलै २०१२मध्ये राष्ट्रपती निवडणूक लढवल्यानंतर, पक्ष शिस्तीचे गैरवर्तनामुळे NCP तून काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१९ रोजी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. ईशान्य भारतातील हा पहिला राजकीय पक्ष आहे, ज्याने हा मान मिळविला आहे.[] पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे.[] त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात, असा पक्षाचा विश्वास आहे.[]

पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये तुरा लोकसभा मतदारसंघामधून NPPची अगाथा संगमा लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

निवडणूकीतील कामगिरी

[संपादन]

विधानसभा

[संपादन]
  1. २०१८ मध्ये २० जागा जिंकल्या.
  2. २०२३ मध्ये २८ जागांवर विजय.

संसद

[संपादन]

राज्यसभा

[संपादन]

१ खासदार

लोकसभा

[संपादन]
  • अगाथा संगमा

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "NPP Becomes First Political Outfit from the Northeast to get Status of National Party". News18. 2019-06-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Political Parties And Election Symbols as on 08-03-2011" (PDF). 28 January 2013 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 7 January 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Sangma launches National People's Party, forms alliance with NDA

बाह्य दुवे

[संपादन]