Jump to content

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे
सचिव अनिल देसाई, विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर
लोकसभेमधील पक्षनेता अरविंद सावंत
राज्यसभेमधील पक्षनेता संजय राऊत
स्थापना 10 ऑक्टोबर 2022 (3 वर्षां पूर्वी) (2022-१०-10) (ECI च्या आदेशाने)
संस्थापक उद्धव ठाकरे
विभाजित शिवसेना
युती महाविकास आघाडी | शिवयुती - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
लोकसभेमधील जागा
०९ / ५४३
राज्यसभेमधील जागा
०३ / २४५
विधानसभेमधील जागा
१९ / २८८
राजकीय तत्त्वे महाराष्ट्रवाद,ज्वलंत हिंदुत्व, मराठी अस्मिता[][] हिंदू राष्ट्रवाद[]

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)[][][] हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष असून तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये निवडणूक आयोगामुळे स्थापन झालेला आहे. या पक्षाला निवडणूक आयोगाने मुख्य शिवसेनेपासून वेगळे असे नवे चिन्ह दिले होते, कारण इ.स. २०२२ च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाचा परिणाम म्हणून मुख्य शिवसेनेत दुफळी निर्माण झाली होती, त्यामुळे तात्पुरता मुख्य शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे बोधचिन्ह गोठवून दोन गटांचे दोन स्वतंत्र पक्ष निर्माण करण्यात आले होते, पैकी दुसरा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना हा होय.

पक्षनेते

[संपादन]
अ. क्र. नाव छायाचित्र पदनाम
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष-प्रमुख
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री
अरविंद सावंत गटनेते, लोकसभा
संजय राऊत गटनेते, राज्यसभा
अजय चौधरी नेते, महाराष्ट्र विधानसभा
आदित्य ठाकरे माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार तथा विधिमंडळ पक्षनेते
भास्कर जाधव गटनेते, महाराष्ट्र विधानसभा
विनायक राऊत नेते, लोकसभा
अंबादास दानवे मा.विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद


राज्यसभा सदस्य

[संपादन]
अ. क्र. नाव नेमणुकीची तारीख सेवानिवृत्तीची तारीख
संजय राऊत ०५ जुलै २०२२ ०४ जुलै २०२८
प्रियंका चतुर्वेदी ०३ एप्रिल २०२० ०२ एप्रिल २०२६

लोकसभा खासदार

[संपादन]

सर्वांची निशाणी- मशाल

  1. अरविंद सावंत, गटनेते-लोकसभा
  2. अनिल देसाई, माजी राज्यसभा सदस्य
  3. ओमराजे निंबाळकर, धाराशिव
  4. बंडू जाधव, परभणी
  5. नागेश शिंदे (आष्टीकर), हिंगोली
  6. संजय दिना पाटील
  7. संजय देशमुख, (यवतमाळ)
  8. राजाभाऊ वाजे, नाशिक
  9. भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी

पक्ष-चिन्ह वाद

[संपादन]
  1. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात उद्धव ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नवीन नांव आणि निवडणूक चिन्ह म्हणून मशाल (Flaming torch) दिले होते, ज्यावर समता पक्षच्या शीर्ष नेतृत्वाने आपले मूळ चिन्ह असल्याचा दावा केला आहे.
  2. समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी मशाल चिन्हासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु तिथे याचिका फेटाळली गेली.
  3. तद्नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले, परंतु धगधगती मशाल हे चिन्ह ठाकरेंनाच मिळाले.
  4. एसंशिं गटाच्या धनुष्यबाण चिन्हाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित.

विधानसभा आमदार (निशाणी-मशाल)

[संपादन]
  1. आदित्य ठाकरे, विधिमंडळ पक्ष-नेते
  2. भास्कर जाधव, विधानसभा गटनेते
  3. वरुण सरदेसाई
  4. हारुण खान, वर्सोवा
  5. अजय चौधरी
  6. दिलीपराव सोपल, बार्शी
  7. कैलास घाटगे-पाटील, धाराशिव
  8. संजय पोतनीस
  9. संजय देरकर, वणी (जि. यवतमाळ)
  10. सुनिल राजाराम राऊत
  11. सुनिल प्रभु, प्रतोद
  12. नितीन देशमुख, मालेगांव जि. अकोला
  13. डॉ. राहुल पाटील, परभणी
  14. प्रवीण स्वामी (सर), उमरगा
  15. महेश सावंत, माहिम
  16. गजानन लवाटे, दर्यापूर (जि.अमरावती)
  17. मनोज जामसूतकर
  18. अनंत (बाळा) नर
  19. सिद्धार्थ खरात

शिवयुती - (शिवशक्ती)

[संपादन]

२४ डिसेंबर २०२६ रोजी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षांची अधिकृत युती जाहीर केली. या युतीला कार्यकर्त्यांनी शिवयुती - शिवशक्ती असे नाव‌ दिले.

२०२५-नगरपालिका निवडणूका

[संपादन]
  1. किनवट नगरपालिका- नगराध्यक्ष

२०२६ महानगरपालिका निवडणूका

[संपादन]
  1. परभणी महानगरपालिका
  2. चंद्रपूर शहर महानगरपालिका
  3. बृहन्मुंबई महानगरपालिका

संदर्भ

[संपादन]
  1. "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
  2. "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
  3. "Uddhav Thackeray defines Shiv Sena's Secular Hindutva". 9 June 2022.
  4. "Team Eknath Shinde Now 'Balasahebanchi Shiv Sena', 'Mashaal' Poll Symbol for Uddhav Camp".
  5. "Thackeray-led Sena gets 'mashaal' as election symbol; Shinde camp asked to give fresh list".
  6. "शिंदे-उद्धव गुटों को नए नाम अलॉट, निशान एक को: एकनाथ को गदा देने से EC का इनकार; ठाकरे को मशाल सिंबल मिला". 10 October 2022.

बाह्य दुवे

[संपादन]