स्वतंत्र पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्वतंत्र पक्ष
Swatantra-Party-flag.svg
स्थापना ऑगस्ट, १९५९
राजकीय तत्त्वे उदारमतवाद

स्वतंत्र पक्ष हा चक्रवर्ती राजगोपालचारी आणि एन.जी. रंगा व इतर राजकरण्यांनी स्थापन केलेला उदारमतवादी पक्ष होता.[१] या पक्षाचा नेहरुंच्या समाजवादी धोरणांना व लायसन्स राजला विरोध होता. [२]

स्वतंत्र पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत ६.८% मते आणि तिसऱ्या लोकसभेत १८ जागा मिळवू शकला. बिहार, राजस्थान, गुजरात आणि ओरीसा या राज्यात तो मुख्य विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. या पक्षाने चौथ्या लोकसभेच्या निवडणुकीत ८.७% मते आणि ४४ जागा मिळवल्या. पण इ.स. १९७१ मधील निवडणूकीत ३% मते व ८ जागाच मिळवू शकला.[३] राजाजींच्या निधनानंतर पक्ष लगेचच अस्तास गेला व शेवटी चरण सिंगांच्या भारतीय क्रांती दलात विलीन झाला.

महत्त्वाचे नेते आणि निगडित व्यक्ती[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. राजमोहन गांधी. "C. Rajgopalchari and the birth of the Swatantra Party" (इंग्रजी मजकूर). रेडीफ. ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले. 
  2. "The 21 Principles of the Swatantra Party (1959)" (इंग्रजी मजकूर). ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी पाहिले. [ ]
  3. Chandra, Bipan & others (2000). India after Independence 1947-2000, New Delhi:Penguin Books, ISBN 0-14-027825-7, p.214


बाह्य दुवे[संपादन]