ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
Indian Election Symbol Kite.svg
पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी
स्थापना इ.स. १९२६
मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा
लोकसभेमधील जागा
२ / ५४३
विधानसभेमधील जागा
७ / ११९
(तेलंगणा)
२ / २८८
(महाराष्ट्र)
५ / २४३
(बिहार)
राजकीय तत्त्वे इस्लाम
संकेतस्थळ www.aimim.in

ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (संक्षेप: एआयएमआयएम) (उर्दू: کل ہند مجلس اتحاد المسلمين) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व असून येथील विद्यमान खासदार असदुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत.

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी मुंबईमधील भायखळाऔरंगाबादमधील औरंगाबाद मध्य ह्या दोन जागांवर विजय मिळवला.

इ.स. २०१८ मधे एमआयएमने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाशी युती केली.[१][२] दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या. महाराष्टातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबादच्या एका जागेवर एमआयएमचा विजय झाला. तर बाकीच्या ४७ जागांवर मात्र वंबआचा पराभव झाला.[३]

इ.स. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मात्र एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांची युती होऊ शकली नाही. त्यामुळे एमआयएमने २८८ पैकी ४४ जागांवर आपले उमेदवार उभे केले. यापैकी २ जागांवर एमआयएमने विजय मिळवला. मालेगाव (मध्य) या मतदारसंघातून मुफ्ती ईस्माईल तर धुळे (शहरी) मतदारसंघातून शाह फारुक अन्वार यांनी विजय मिळवला. २०१९ साली झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एमआयएमने एकूण ७,३७,८८८ (१.३४%) मते मिळवली.

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019
  2. ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869
  3. ^ https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313