लालन सारंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लालन सारंग
जन्म लालन सारंग
२६-१२-१९४१
गोवा
मृत्यू ०९-११-२०१८
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पती कमलाकर सारंग

लालन सारंग - माहेरच्या पैंगणकर (जन्म : गोवा, २६ डिसेंबर १९४१; - पुणे, ९ नोव्हेंबर २०१८) या एक मराठी नाट्यअभिनेत्री होत्या. इ.स. १९६८पासून त्या नाट्यक्षेत्रात होत्या.

‘अभिषेक’ व ‘कलारंजन’ या त्यांच्या घरच्या नाट्यसंस्था होत्या. ह्या संस्थांच्या नाटकांतही लालन सारंग यांनी भूमिका केल्या.

लालन सारंग यांची गाजलेली नाटके (कंसात नाटकातील भूमिका)[संपादन]

  • आक्रोश (वनिता)
  • आरोप (मोहिनी)
  • उद्याचा संसार ()
  • उंबरठ्यावर माप ठेविले ()
  • कमला (सरिता)
  • कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)
  • खोल खोल पाणी (चंद्राक्का)
  • गिधाडे (माणिक)
  • घरकुल()
  • घरटे अमुचे छान (विमल)
  • चमकला ध्रुवाचा तारा ()
  • जंगली कबुतर (गुल)
  • जोडीदार (शरयू)
  • तो मी नव्हेच ()
  • धंदेवाईक (चंदा)
  • पोलीसनामा
  • बिबी करी सलाम()
  • बेबी (अचला)
  • बुवा तेथे बाया
  • मी मंत्री झालो ()
  • मोरूची मावशी
  • रथचक्र ('ती' ब्राह्मण स्त्री)
  • राणीचा बाग
  • लग्न
  • लग्नाची बेडी ()
  • सखाराम बाइंडर (चंपा)
  • संभूसांच्या चाळीत ()
  • सहज जिंकी मना (मुक्ता)
  • सूर्यास्त (जनाई)
  • स्टील फ्रेम (हिंदी)
  • स्वयम्

चित्रपट[संपादन]

  • सामना
  • हा खेळ सावल्यांचा

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • रथचक्र (हिंदी)

लालन सारंग यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • चटकदार पाककृती
  • जगले जशी
  • नाटकांमागील नाट्य
  • बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती
  • मी आणि माझ्या भूमिका

कार्यक्रम[संपादन]

  • लालन सारंग 'मी आणि माझ्या भूमिका' हा कार्यक्रम करीत असत.

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला होता..
  • पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार (२२-१-२०१५)
  • इ.स. २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार (२४ जानेवारी, २०१७)