वालझिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीक्षेत्र वालझिरी हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ असणारे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. श्रीक्षेत्र वालझिरी येथे प्राचीन शिवमंदिर आहे तसेच महर्षी वाल्मिकींचे देखील समाधी मंदिर आहे. याबरोबरच विठ्ठल मंदिर, गोरक्षनाथ मंदिर, दत्त मंदिर आणि राम मंदिर देखील आहे. श्रीक्षेत्र वालझिरी येथील प्राचीन शिवालयाच्या समोर जलाशय देखील आहे. या जलाशयात पर्वणी काळात स्नान केल्यास अपत्यप्राप्ती होते अशी लोकांची श्रद्धा आहे. दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषिपंचमी तसेच सोमवती अमावस्येच्या दिवशी येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते.

    श्रीक्षेत्र वालझिरी येथील शिवमंदिर अत्यंत प्राचीन आहे. महर्षी वाल्मिकी ऋषींची तपोभूमी म्हणून हे स्थान परिचित आहे.  येथेच वाल्याचा वाल्मिकी झाला अशी सर्व भाविकांची समजूत आहे. शिवालया समोरील जलाशयाच्या तळाशी आणखीन एक प्राचीन शिवमंदिर असल्याचे जुने जाणकार लोक सांगतात आणि तसे पुरावे देखील उपलब्ध आहेत. अत्यंत निसर्गरम्य आणि जागृत असणाऱ्या या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी देशभरातून भाविक आवर्जून येत असतात.