चिपळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिपळ्या या पानावरून पुनर्निर्देशित)
’चिपळी’,एक छोटेखानी घनवाद्य

’चिपळी’ हे हातातील बोटांमघ्ये धरून वाजवयाचे एक छोटेखानी वाद्य आहे, जे लाकूड आणि धातूंच्या पातळ झांजा पासून बनविले जाते आणि ते घनवाद्ये ह्या वर्गात मोडले जाते. काही पौराणिक सिनेमा-नाटकांमध्ये श्रीनारद मुनी, ’नारायण, नारायण’ म्हणत डाव्या हाताने हीच ’चिपळी’ वाजवताना दाखवतात. महाराष्ट्रातील संतांनी समाज प्रबोधन आणि हरीभक्तीचा प्रसार आपल्या अभंग, कीर्तन ह्या द्वारे केला, त्यातील संगीताचा एक भाग म्हणजेच त्या कीर्तनकारांच्या हातातील ’चिपळया’.

चिपळीचे मुख्यत: दोन भाग असतात, एक भाग जो साधारणत: जाडा असतो तो अंगठयामध्ये घालतात आणि दुसरा, उरलेल्या चार बोटांनी धरतात आणि दोन्ही भागांचे एकमेकांवर आघात केल्यावर त्यातील पातळ झांजांमुळे एक मधुर नाद उत्पन्न होतो. बहुदा ह्यामुळेच कीर्तनकार ’चिपळी’चा वापर आपल्या भजन-कीर्तनात करत असावेत.