स्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

, , , , , , , , , , , , ,

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘, हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत.(शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इग्रजीचे स्वर वर्ण मालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )

ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात.मराठी भाषेत अ,आ,इ,ई,उ,ऊ,ऋ,ऌ,ए,ऐ,ओ,औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ,आ,इ,ई,उ,ऊ,ऋ,ऌ,ए,ऐ,ओ,औ असे एकूण बारा स्वर आहेत. वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर 1. ऱ्हस्व स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो किंवा स्वर उच्यारण्यास लागणारी हवा कमी सोडावी लागते त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ,इ,ऋ,ऌ,उ 2. दीर्घ स्वर : ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो किंवा स्वर उच्यारण्यास लागणारी हवा जास्त सोडावी लागते त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ स्वरांचे इतर प्रकार 1. सजातीय स्वर : एकाच उच्चार whatever

जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.

उदा. अ-आ,उ-ऊ,ओ-औ,इ-ई,ए-ऐ 2. विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थांनामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा. अ-ई,उ-ए,ओ-ऋ 3. संयुक्त स्वर : दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे 4 स्वर आहेत. ए – अ+इ/ई ऐ – आ+इ/ई ओ – अ+उ/ऊ औ – आ+उ/ऊ 2. स्वरादी : ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वर + आदी – स्वरादी दोन स्वरादी – अं, अः स्वरादी मध्ये अनुस्वार व विसर्ग यांचा समावेश होतो. दोन नवे स्वरदी : ॲ, ऑ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदा. बॅट, बॉल स्वरादीचे एकूण तीन भाग पडतात. अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग क. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. उदा. गंगा, चंचल इत्यादी.

स्वरांचे व्युत्पत्ती नुसार प्रकार.

मुख्य प्रकार[संपादन]

१) ऱ्हस्व स्वर[संपादन]

ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात.
उदा. , , , , लृ ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्या स्वरांना र्हठस्व स्वर असे म्हणतात. उदा. अ, इ, ऋ, उ

२) दीर्घ स्वर[संपादन]

ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
उदा. , , ज्या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. उदा. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

३) संयुक्त स्वर[संपादन]

दोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात.
उदा.

  1. ए = अ + इ/ई
  2. ऐ = आ + इ/ई
  3. ओ = अ + उ/ऊ
  4. औ = आ + उ/ऊ

इतर प्रकार[संपादन]

४) सजातीय स्वर[संपादन]

एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ – आ, इ – ई, उ – ऊ

५) विजातीय स्वर[संपादन]

भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ – इ, अ – उ, इ – ए, अ – ऋ

मात्रा[संपादन]

ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या मात्रा ठरतात.

  1. ऱ्हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची एक मात्रा असते.
  2. दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची दोन मात्रा असते.

हे सुद्धा पहा[संपादन]

साचा:मराठी व्याकरण