चर्चा:श्रावण पौर्णिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लेख एकत्रिकरणार्थ[संपादन]

नारळी पौर्णिमा हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.

या दिवशी महाराष्ट्रातले कोळी व इतर समुद्राशी निगडित व्यवसायांतील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते.

ज्या मराठी घरांत रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात.

भुजरिया आणि पोळा हे मुद्दे स्वतंत्र आहेत त्यांचा आशयही पूर्णतः वेगळा आहे. त्यांचा श्रावण पौर्णिमा या आशयाशी थेट संबंध नाही त्यामुळे ते दोन लेख स्वतंत्र करीत आहे. --आर्या जोशी (चर्चा) १२:०७, ३० जुलै २०१९ (IST)Reply[reply]

बाह्य दुवा[संपादन]