Jump to content

"अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
थोडा बदल
(चर्चा | योगदान)
किंचित भर
ओळ ३: ओळ ३:
'''{{लेखनाव}}''' ही कालमापनातील एक तिथी आहे. ज्यावेळी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतीर्विदांच्या मते या ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे. यावरून अत्रीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते. त्याला अमावस्या ज्ञात असली पाहिजे. ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. चातुर्दशीयुक्त अमावस्येलाच सिनीवाली म्हणतात. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.

सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात व मौनी अमावास्या माघात येते.
सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात व मौनी अमावास्या माघात येते. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात.

== संदर्भ ==
== संदर्भ ==

१७:५३, ४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अमावास्येच्या रात्रीचा चंद्र

अमावास्या ही कालमापनातील एक तिथी आहे. ज्यावेळी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतीर्विदांच्या मते या ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे. यावरून अत्रीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते. त्याला अमावस्या ज्ञात असली पाहिजे. ऋग्वेदात सिनीवाली नामक देवतेचा निर्देश आढळतो. अपत्यप्राप्तीसाठी तिची पूजा केली जात असे. चातुर्दशीयुक्त अमावस्येलाच सिनीवाली म्हणतात. अथर्ववेदात अमावास्येलाच सिनीवाली म्हटले आहे.

सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या हे नाव आहे. त्या दिवशी बैलपोळा असतो. सर्वपित्री अमावास्या भाद्रपदात व मौनी अमावास्या माघात येते. आषाढी अमावास्येला सुसंस्कृत माणसे दिव्याची अमावास्या, तर अन्य लोक गटारी अमावास्या म्हणतात.

संदर्भ

भारतीय संस्कृतीकोश खंड १