Jump to content

"ज्ञानेश्वरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ २३: ओळ २३:


==ज्ञानेश्वरीचे निरूपण करणारे अनेक ग्रंथ आहेत, त्यांपैकी काही हे==
==ज्ञानेश्वरीचे निरूपण करणारे अनेक ग्रंथ आहेत, त्यांपैकी काही हे==
* अध्यात्माचा शास्त्रीय अन्वयार्थ अर्थात ज्ञानेश्वरीचे सुलभ संकलन (धनश्री कानिटकर)
* The Genius of Dnyaneshwar (डेमी-साईज पृष्ठसंख्या १०३४, लेखक - [[रवीन थत्ते]])
* The Genius of Dnyaneshwar (डेमी-साईज पृष्ठसंख्या १०३४, लेखक - [[रवीन थत्ते]])
* ’अमृतकण’ ज्ञानेश्वरी (रमेश लिमये)
* ’अमृतकण’ ज्ञानेश्वरी (रमेश लिमये)

००:२६, ५ जून २०१७ ची आवृत्ती

विकिस्रोत लोगो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ अथवा याच्याशी संबंधित मूळस्रोत लेखन/दस्त मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:

हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृत


शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते.

सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

संशोधित प्रती

ज्ञानेश्वरीच्या जुन्याजुन्या प्रती शोधून काढून त्यांच्यावर अनेकांनी संशोधन केले. गणेश बापूजीशास्त्री मालवणकर, रा.श्री. गोंधळेकर, जांभेकर, देवस्थळी, ना.रा. सोहोनी, हर्षे, बनहट्टी, प्रियोळकर, मंगरूळकर, रामदास डांगे, पां.ना. कुलकर्णी ही त्यांतील संशोधकांची काही नावे. अशा विद्वानांच्या संशोधक वृत्तीतून ज्ञानेश्वरीच्या सुधारित प्रती तयार झाल्या. त्यांतील काही प्रती या -

  • कुंटे प्रत (अण्णा मोरेश्वर कुंटे यांची ’बरवा’ पद्धतीची प्रत) : ही प्रत इ.स. १८९४ ते १९४५पर्यंत निर्णयसागर प्रकाशनाकडून, आणि नंतर पाठक आणि इतर प्रकाशकांकडून (उदा० वामनराज प्रकाशन संस्था) प्रसिद्ध होत राहिली आहे.
  • विष्णुबुवा जोग महाराज प्रत
  • सोनोपंत दांडेकर प्रत
  • गोविंद बर्वे प्रत (गोविंद बर्वे यांनी इ.स. १६९१मध्ये ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका या नावाने संबोधिले.त्यापूर्वी, इ.स. १६७८मध्ये वामनपंडितांनी स्वत: लिहिलेल्या भगवद्‌गीतेवरील टीकाग्रंथाला यथार्थदीपिका हे नाव दिले होते.).
  • भिडे प्रत
  • माडगांवकर प्रत
  • राजवाडे प्रत
  • साखरे महाराज प्रत

राजवाडे प्रत

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांनी ज्ञानेश्वरीची जुनी प्रत शोधून तिचे व्याकरण सिद्ध केले. 'ज्ञानेश्वरीचे व्याकरण उलगडून दाखवताना राजवाड्यांनी मराठीचा इतिहास पण सांगितला आहे . बरवे प्रत, माडगावकर प्रत, पारंपरिक प्रत अशा ज्ञानेश्वरीच्या इतरही काही प्रती आहेत. राजवाड्यांनी वापरलेली प्रत बालबोध लिपीत आहे. ही एकनाथपूर्व प्रत असावी.

परकीय आक्रमणांपासून मुक्त महाराष्ट्रातला हा ग्रंथ जुन्या शुद्ध मराठीची वळणे दाखवतो.

ज्ञानेश्वरीचे निरूपण करणारे अनेक ग्रंथ आहेत, त्यांपैकी काही हे

  • अध्यात्माचा शास्त्रीय अन्वयार्थ अर्थात ज्ञानेश्वरीचे सुलभ संकलन (धनश्री कानिटकर)
  • The Genius of Dnyaneshwar (डेमी-साईज पृष्ठसंख्या १०३४, लेखक - रवीन थत्ते)
  • ’अमृतकण’ ज्ञानेश्वरी (रमेश लिमये)
  • जाणीव भाग १, २ (ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांवर लिहिलेले हे मुक्त निबंध आहेत. एकूण १३४ ओव्यांवर यामध्ये भाष्य केलेले आहे) (लेखक - रवीन थत्ते)
  • माणूस नावाचे जगणे (ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे केलेले 'माणुसकी'बद्दलचे विवेचन) (लेखक - रवीन थत्ते)
  • मी हिंदू झालो (वैचारिक) (लेखक - रवीन थत्ते)
  • येई परतुनी ज्ञानेश्वरा (लेखक - डॉ. राचंद्र मोरवंचीकर)
  • (वि)ज्ञानेश्वरी (तत्त्वज्ञानविषयक, लेखक - रवीन थत्ते, सहलेखिका - मृणालिनी चितळे)
  • ज्ञानेश्वरी भाग १, २. (लेखक - रवीन थत्ते)
  • ज्ञानेश्वरी (ओबडधोबड) भाग १, २. (लेखक - रवीन थत्ते)
  • ज्ञानेश्वरी विशेष चिंतन ((नामदेवशास्त्री महाराज, ’सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ७० लेखांचे संकलन)

ज्ञानेश्वरीची पूर्वपीठिका

सारांश

अध्याय १

ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥ देवा तूंचि गणेशू । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवॄत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥ हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ती सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥

अध्याय २

आत्म्याची संकल्पना व त्याचे अमरत्व याचे विवरण. सांख्ययोग, समत्वबुद्धी यांचे विवरण. स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे.

अध्याय ३

कर्माचे महत्त्व व कर्मयोगाची महती.

अध्याय ४

कर्मयोगज्ञानयोग यांचे विवरण

अध्याय ५

कर्मयोगकर्मसंन्यासयोग यांचे विवरण.

अध्याय ६

ध्यानयोगाचे विवरण, मनाची शांती व चंचलता यांचे विवरण.

अध्याय ७

प्रकृती, त्रिगुणमाया यांचे विवरण.

अध्याय ८

ब्रह्म, अध्यात्म, कर्म यांचे विवरण.

अध्याय ९

अध्याय १०

अध्याय ११

श्रीकृष्णाच्या विश्व-रूपाचे विवरण.

अध्याय १२

भक्तियोगाची लक्षणे व महती

अध्याय १३

पंचमहाभूतात्मक शरीर, त्याचे विकार यांची माहिती, ज्ञानअज्ञान यांची लक्षणे, प्रकृतीपुरुष यांची माहिती.

अध्याय १४

सत्त्व, रजतम या त्रिगुणांची लक्षणे.

अध्याय १५

अध्याय १६

दैवीअसुरी वृत्तीच्या पुरुषांची लक्षणे.

अध्याय १७

अध्याय १८

पसायदान हे १८व्या अध्यायाचा एक भाग आहे.

बाह्यदुवे

विकिस्रोत
विकिस्रोत
ज्ञानेश्वरी हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

बाह्य दुवे

वेद
ऋग्वेदयजुर्वेदसामवेदअथर्ववेद