प्रकृती
प्रकृती (इंग्रजी: Nature ; संस्कृत भाषा: प्रकृति [१]) निसर्ग किंवा सृष्टी ,जगत होय.ही विश्वाचे मुळ निर्मितीकारण आहे.[२]प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून ‘सर्ग’ किंवा सृष्टी निर्माण झाले.[३]
प्रकृतीपासून सत्त्वगुण , रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण उत्पन्न झाली.
सांख्यदर्शनामते, पुरुष हा जीवात्मा [४](चेतन) व प्रकृती ही त्रिगुणात्मक( अचेतन वा जड) आहे अशी दोन तत्त्वे मानली आहेत.[५]
प्रकृति ही वैदिक शास्त्रात माया संकल्पनेशी संबंधित आहे.
पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी पंचमहाभूतांपासून निर्मिती झाली. खालीलदिल्याप्रमाणे
३. अग्नि
४. वायू
५. आकाश
व्युपत्तिशास्त्र
[संपादन]प्र=विशेष आणि कृती=केलेले. [६]
भगवद्गीता
[संपादन]भगवद्गीतामध्ये, १३ व्या व १४ व्या अध्यायात, श्रीकृष्ण अर्जुनाला त्रिगुण व पुरुष प्रकृतीविषयी सांगितले आहे.
[संपादन]मूळ श्लोक[७]
प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि । विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् ॥ १३-१९ ॥
अर्थ
प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि राग-द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत, असे समज. ॥ १३-१९ ॥
- मूळ श्लोक[८]
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन्गर्भं दधाम्यहम् । सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ १४-३ ॥
अर्थ
हे भारता (अर्थात भरतवंशी अर्जुना), माझी महद्ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतनसमुदायरूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड-चेतन संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते. ॥ १४-३ ॥
- मूळ श्लोक[८]
सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः ॥ तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता ॥ १४-४ ॥
अर्थ
हे कौंतेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), नाना प्रकारच्या सर्व जातीत जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात, त्या सर्वांचा गर्भ धारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. ॥ १४-४ ॥
- मूळ श्लोक[८]
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः । निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥ १४-५ ॥
अर्थ
हे महाबाहो अर्जुना, सत्त्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले तिन्ही गुण अविनाशी जीवात्म्याला शरीरात बांधून ठेवतात. ॥ १४-५ ॥
संदर्भ यादी
[संपादन]- ^ "Prakṛti". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-01-13.
- ^ http://philosophia.yolasite.com/resources/SYBA%20SPL%201%20Unit%207%20Samkhya-Yog%20Philosophy.pdf
- ^ "संख्यादर्शन". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-01-13 रोजी पाहिले.
- ^ "सांख्य दर्शन". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2019-04-22.
- ^ "Bhagvadgita तेरहवॉं adhyaya - Wikisource". wikisource.org. 2020-01-13 रोजी पाहिले.
- ^ Bhagwan, Dada (2019-12-20). Aptavani-1 (In Marathi). Dada Bhagwan Aradhana Trust. ISBN 978-93-87551-50-3.
- ^ "श्रीमद्भगवद्गीता : तेरावा अध्याय (क्षेत्रक्षत्रज्ञविभागयोग) - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-01-13 रोजी पाहिले.
- ^ a b c "श्रीमद्भगवद्गीता : चौदावा अध्याय (गुणत्रयविभागयोग) - विकिस्रोत". mr.wikisource.org. 2020-01-13 रोजी पाहिले.