विश्व
Jump to navigation
Jump to search

महास्फोट व सतत प्रसरण पावणारे विश्व
"काल-अवकाशातील सर्व कण, ऊर्जा आणि पदार्थ यांची गोळाबेरीज" अशी विश्वाची व्याख्या करता येते. आपण पाहू शकत असलेले (दृश्य) विश्व हे संपूर्ण विश्वाचा एक अत्यंत छोटा भाग आहे असे अनेक खगोलशास्त्रज्ञ मानतात.
विश्वाचा पसारा अनंत असून त्याची उत्पत्ती एका महास्फ़ोटातून (Big bang) झाली असे मानले जाते. विश्व हे सतत प्रसरण पावत आहे. (Expanding universe). नव्वदच्या दशकातील निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की विश्वप्रसरणाचासुद्धा वेग वाढता आहे.