Jump to content

पंचमहाभूते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पंचमहाभूते सांख्यदर्शनानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीवनिर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते.

या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.

हिंदू धर्मातील तत्त्वज्ञानावर प्राचीन सांख्यदर्शन या शास्त्राचा मोठा प्रभाव आहे.

ही मूळतत्त्वे खालील प्रमाणे आहेत.

यातील प्रथम तत्त्व अग्नि येते

पृथ्वी

[संपादन]

माती, दगड व त्यापासून निर्माण झालेले सर्व जड, कठीण, घन पदार्थ.

आप (जल)

[संपादन]

पाणी, वाफ, ढग व सर्व द्रव, ओले, मृदू पदार्थ.

तेज (अग्नी)

[संपादन]

ऊर्जा: अग्नी (क्षेपणास्त्र), किरणे, प्रारणे (Radiation), उष्णता, वीज, प्रकाश या स्वरूपात.

वायू

[संपादन]

हवा, चैतन्य, हालचाल, चलनवलन, तरलता आणि वेग.

आकाश

[संपादन]

अवकाश, आकाशपोकळी.

देवस्थाने

[संपादन]

या पंचमहाभूतांची देवस्थाने पुढीलप्रमाणे-

१.पृथ्वी- कांचिवरम

२.आप- जम्बुकेश्वर

३.तेज- अरुणाचल

४.वायू- कालहस्ती

५.आकाश- चिदंबरम

पंचमहाभूते आणि त्यांची वैशिष्ट्ये

[संपादन]
क्र पंचमहाभूते प्रकार अनुभव संबंधित इंद्रिय गुणधर्म / वैशिष्ट्ये
पृथ्वी रूप नेत्र सर्वात स्थूल तत्त्व, भौतिक आकारमय द्रव्य, रोधक शक्ती, स्थूलता, टिकाऊपणा, अभेद्य अलगपणा []
आप शब्द श्रवणेंद्रिय
तेज गंध घ्राणेंद्रिय
जड अग्नी हा अग्नी ही रासायनिक अभिक्रियांमधून निर्माण होतो. यामध्ये घटक अणूंमध्ये कोणताही बदल न होता, रेणू नष्ट होतात आणि पुन्हा नव्याने तयार होतात.
वैद्युत अग्नी हाअग्नी अणूमधील इलेक्ट्रॉन्सच्या बाह्य स्तरांमध्ये होणाऱ्या बदलांतून उद्भवतो. हे बदल सर्व विद्युतचुंबकीय घटनांचे मूळ आहेत.
सौर अग्नी [] यापासून प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग उत्सर्जित होतो.आणि हे हायड्रोजनच्या केंद्रकांचे हेलियममध्ये होणाऱ्या संमीलन प्रक्रियेदरम्यान (Bethe cycle) घडते. []
वायू (लाईफ-एनर्जी) रस रसना वायूवर प्रभुत्व निर्माण झाले की गुरुत्वाकर्षण शक्तीपासून मुक्तता होते आणि अणिमा, लघिमा या सारख्या सिद्धी योग्यांना प्राप्त होतात. []
आकाश (इथर) स्पर्श त्वचा सर्वात सूक्ष्म तत्त्व, चैतन्य-द्रव्य, अनंतता, एकता, अविभाज्यता

संदर्भ

[संपादन]
  1. Sri Aurobindo (2000). The Life Divine [दिव्य जीवन - खंड पहिला]. THE COMPLETE WORKS OF SRI AUROBINDO. VOLUME 21 and 22. Senapati Bapat द्वारे भाषांतरित. Puducherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-618-6.
  2. 1 2 3 The Mother (2003). Questions and Answers 1953. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 05. (Extract from a talk of Sri Aurobindo with a French scientist-disciple) 8 May 1926 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. p. 66. ISBN 81-7058-670-4.