त्रिगुण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अर्थ[संपादन]

सत्त्व, रजतम हे तीन गुण. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. मोक्ष किंवा मुक्ती मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.

ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, गीताई इ. ग्रंथांमध्ये यांबद्दल विस्तृत विवरण आढळते.

गीताई अ. १४ मधील वर्णन[संपादन]

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥

त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥

रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥

अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥

प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥

प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥

अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥