विले पार्ले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विले पार्ले हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. आजही मराठी भषिक रहिवाशांचे वर्चस्व असलेल्या पार्ल्यात पार्ले-जी ह्या सुप्रसिद्ध भारतीय बिस्किट कंपनीचा पहिला बिस्किटांचा कारखाना होता.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डॉमेस्टिक (आंतर्देशीय) टर्मिनल पार्ल्यामध्येच आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरून आंतरराष्ट्रीय टर्मिनसकडे जाण्यासाठी बांधलेला सहार उन्नत मार्ग देखील पार्ल्यामध्येच आहे.