सहार उन्नत मार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सहार उन्नत मार्ग
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २.२ किलोमीटर (१.४ मैल)
सुरुवात विले पार्ले, पश्चिम द्रुतगती महामार्ग
शेवट छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
स्थान
शहरे मुंबई
राज्ये महाराष्ट्र
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून भुयारी रस्त्याद्वारे सहार मार्गावर प्रवेश

सहार उन्नत मार्ग (Sahar Elevated Access Road) हा मुंबई शहरामधील एक रस्ता आहे. २.२ किमी लांबीचा हा गतिमार्ग पश्चिम गति महामार्गाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ सोबत जोडतो.

हा मार्ग बांधण्याआधी मुंबई विमानतळावर पोचण्यासाठी थेट रस्ता नव्हता व विले पार्ले ते विमानतळ हा रस्ता अरुंद व गर्दीचा बनला होता. केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत ह्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला. भारत सरकार, महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए. व मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड ह्या चार संस्थांनी एकत्रितपणे ह्या बांधकामाच्या ₹ ४००.७७ कोटी इतक्या खर्चाचा भार उचलला. १२ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई विमानतळाच्या नव्या टी२ ह्य टर्मिनलासोबतच सहार उन्नत मार्गाचे देखील उद्घाटन करण्यात आले.

ह्या मार्गामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरून विमानतळावर पोचण्यासाठी लागणारा वेळ ३५ ते ४० मिनिटांवरून केवळ ५ मिनिटांवर आला.

बाह्य दुवे[संपादन]

साचा:मुंबईमधील रस्ते