भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरु केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीनवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.[१][२][३][४][५] या योजनेचा २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.[१]

योजनेच्या अटी[संपादन]

योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत :[२][३][४][५]

  • विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]