Jump to content

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाने २०१६-१७ मध्ये सुरू केलेली एक शैक्षणिक योजना आहे. इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीनवबौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.[][][][][] या योजनेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. सन २०१८-१९ पर्यंत ३५,३३६ विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी ११७.४२ कोटी इतकी रक्कम खर्च करण्यात आलेली आहे.[]

योजनेच्या अटी

[संपादन]

योजनेच्या काही प्रमुख अटी खालीलप्रमाणे आहेत :[][][][]

  • विद्यार्थ्यांना १०वी, १२वी, पदवी किंवा पदविका (डिप्लोमा) परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा अधिक नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा (स्थानिक नसावा).
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजने अंतर्गत लाभ

[संपादन]
  • स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत असेल अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
  • बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थी घेऊ शकतात.
  • लाभार्थी विद्यार्थ्यांना घर, राहणे आणि इतर खर्चासाठी शासनाकडून दरवर्षी 51000ची आर्थिक मदत दिली जाईल.
  • स्वाधार योजनेंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये अभ्यास सुरू ठेवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
  • आणि तुम्ही डिप्लोमा प्रोफेशनल आणि नॉन-प्रोफेशनल कोर्समध्ये अर्ज करण्यास पात्र असाल.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b महाराष्ट्र शासन. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना". लोकराज्य: ५९.
  2. ^ a b शासकीय संकेतस्थळ
  3. ^ a b "महाराष्ट्र स्वाधार योजना 2018-19 अनुसूचित जाति के छात्रों के लिए छात्रवृति: Dr Babasaheb Ambedkar Swadhar Yojana in Hindi". 2 ऑग, 2018. 2019-08-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-08-30 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना — विकासपीडिया". mr.vikaspedia.in.
  5. ^ a b "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना". 27 ऑक्टो, 2017. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)