आधार (ओळखक्रमांक योजना)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आधार ही व्यक्तींसाठीची जगातली पहिली बायोमेट्रिक पॅरामीटरवर आधारित अद्वितीय ओळखक्रमांक योजना (यूआयडी) भारताने राबवली आहे. नियोजन मंडळाच्या आधिपत्याखालील युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) या प्राधिकरणामार्फत तिचे नियंत्रण केले जाते. याअंतर्गत भारतातील व्यक्तींना त्यांची ओळख पटविण्यासाठी एक १२ अंकी क्रमांक दिला जातो. सामाजिक सुरक्षितताविषयक आणि सरकारी मदतीच्या योजनांच्या लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी ही योजना वापरली जाणार आहे. त्याशिवाय सरकारशी संबंधित सर्व व्यवहारांमध्ये व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी हा क्रमांक वापरण्याची योजना आहे.

सुरुवात[संपादन]

सप्टेंबर २९ २०१० ला या योजनेच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. या योजनेअंतर्गत पहिल्या क्रमांकाचे वितरण महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या टेंभली गावातल्या रंजना सोनवणे या महिलेला करण्यात आले. पंतप्रधान मनमोहनसिंग, संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि यूआयडीएआयचे चेअरमन नंदन निलेकणी यावेळी उपस्थित होते.