संजय हरीभाऊ जाधव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय हरीभाऊ जाधव

विद्यमान
पदग्रहण
१६ मे, इ.स. २०१४
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
मतदारसंघ परभणी

जन्म इ.स. १९६७
राजकीय पक्ष शिवसेना

संजय हरीभाऊ जाधव (इ.स. १९६७ - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. जाधव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या परभणी मतदारसंघातून निवडून गेले.

संजय उर्फ बंडू जाधव यांच्या जन्म परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट या भागात राहणाऱ्या श्री हरिभाऊ जाधव आणि श्रीमती अनुसयाबाई जाधव यांच्या घरी १ जून १९६७ रोजी झाला. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण हे परभणी शहरातच झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या बरोबर काही सहकारी घेऊन परभणी मधील काद्राबाद प्लॉट या भागातच राजे संभाजी मित्र मंडळाची स्थापना केली. दिनांक ७ एप्रिल २००२ मध्ये त्यांचा विवाह श्रीमंत क्रांती यांच्याशी झाला. त्यांनी स्थापन केलेल्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी गणेश उत्सव, नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांची सुरुवात केली. हळूहळू अनेक लोक त्यांच्याशी जुळत गेले आणि पुढे २००९ ते २०१४ या कार्यकाळात ते शिवसेनेचे उमेदवार असून परभणीमधून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले.