संत रविदास पुरस्कार
Appearance
संत रविदास पुरस्कार हा पुरस्कार चांभार व इतर अनुसूचित जातीच्या (दलित) समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थाना संत रविदास यांच्या जयंती दिनी ६ फेब्रुवारी रोजी देऊन सन्मानित करण्यात येते. हा पुरस्कार सन २००४-२००५ पासून देण्यात येतो.
लाभाचे स्वरूप
[संपादन]१ व्यक्ती व १ संस्था यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रत्येकी व्यक्तीस २१,००० रुपये, पुरस्कार, सन्मानपत्र, शाल किंवा साडी, खण व श्रीफळ तसेच एका संस्थेसाठी ३०,००१ रुपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात येते.
हे ही पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार