साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
Appearance
(लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.
निकष व अटी
[संपादन]महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[१]
- व्यक्तींसाठीचे निकष
- सामाजिक क्षेत्रातील कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
- पुरस्कार फक्त मातंग समाजातील व्यक्तीकरिता असेल.
- संस्था
- मांतग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षाहून अधिक काळ मौलिक कार्य केलेले असावे.
शिफारश पद्धती
[संपादन]या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[१]
- व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
- विना दुराचार प्रमाणपत्र
- गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
- सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
- संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल
लाभाचे स्वरूप
[संपादन]२५ व्यक्ती व ६ संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी ५०,००० रुपये, शाल व श्रीफळ तर प्रत्येक व्यक्तीस २५,००० रुपये, शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपन्तिक गौरव. एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत.
हे ही पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.