प्रल्हाद लुलेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रल्हाद लुलेकर
जन्म नाव प्रल्हाद गोविंदराव लुलेकर
जन्म ३ मार्च, १९५४ (1954-03-03) (वय: ६५)
सुखापुरी अंबड जालना
शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन, संशोधन
भाषा मराठी
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले
आई गंगाबाई
पत्नी सुशीला लुलेकर
अपत्ये कविता, शीतल, प्रवीण

डॉ. प्रल्हाद गोविंदराव लुलेकर (जन्म:३ मार्च इ.स. १९५४) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील माजी मराठी विभाग प्रमुख, माजी परीक्षा नियंत्रक, लेखक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक व व्याख्याते आहेत.[१]

सुरुवातीचे जीवन व शिक्षण[संपादन]

डॉ. लुलेकर यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता पहिली व दुसरी सिरसगाव येथे तर इयत्ता तिसरी ते सातवी खांडवी येथे झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण इयत्ता आठवी ते दहावी सातोना येथे झाले. लुलेकर यांनी के.के.एम. महाविद्यालय मानवत येथे वसतिगृहात राहून बी.ए. पूर्ण केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मार्च इ.स. १९७७ मध्ये एम.ए. (मराठी) ही पदवी सर्वद्वितीय प्रथम श्रेणीत मिळवली. सन नोव्हेंबर १९९८ मध्ये वेदनांचा प्रदेश संशोधन ग्रंथ लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.

अनुभव आणि कारकीर्द[संपादन]

 • व्याख्याता : कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अंबड जि. जालना इ.स. १९७७ ते इ.स. १९८१.
 • अधिव्याख्याता : कला व वाणिज्य महाविद्यालय अंबड जि. जालना इ.स. १९८१ ते इ.स. १९९२
 • प्राचार्य : श्री आसाराम भांडवलदार महाविद्यालय, देवगांव (रंगारी) ता. कन्नड जि.औरंगाबाद महाविद्यालयात इ.स. २००१ ते इ.स. २००३.
 • प्राध्यापक : मराठी विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद डिसेंबर २००५ ते जून २००५

प्रशासकीय अनुभव[संपादन]

 • साहाय्यक कुलसचिव (परीक्षा) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९९२ ते इ.स. १९९७.
 • उपकुलसचिव(परीक्षा पदव्युत्तर, सांख्यिकी आणि नियोजन, शैक्षणिक) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. १९९७ ते २००१ आणि २००३ ते २००५.
 • मराठी विभाग प्रमुख : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ इ.स. २००६ ते इ.स. २००९ आणि इ.स. २०१० ते इ.स. २०११
 • परीक्षा नियंत्रक : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जून २०१५ ते मार्च २०१६.
 • डॉ.लुलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली १८ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट व २० विद्यार्थ्यांना एम.फिल. प्रदान करण्यात आली आहे.[२]

लेखन आणि साहित्य[संपादन]

ग्रंथ संपदा
अ.क्र पुस्तकाचे नाव साहित्य प्रकार प्रकाशन
भंजनाचे भंजन साहित्य आणि समीक्षा साकेत प्रकाशन
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा- दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैचारिक साहित्य सायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे प्रथम आवृत्ती २०११,द्वितीय -२०१२ तृतीय- २०१४ , चतुर्थ- २०१५
आस्वाद आणि समीक्षा वैचारिक माहितीपर साहित्य आणि समीक्षा स्वरूप प्रकाशन

[३]

बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे संशोधन पद्मगंगा प्रकाशन, पुणे २१ मार्च २०१५ [४]
गावगाड्याचे शिल्पकार कला कौशल्य, माहितीपर, सामाजिक स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद १५ ऑगस्ट २००९
साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग - १ लेख सायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे इ.स. २०१४
साठोत्तरी साहित्य प्रवाह भाग - २ लेख सायन पब्लिकेशन प्रा. लि. पुणे इ.स. २०१४ [५]
गैर दालीतोंके भी उद्धारक बाबासाहेब डॉ. आंबेडकर (हिंदी साहित्य) सामाजिक व माहितीपर सम्यक प्रकाशन [६]
आले ढग...गेले ढग... काव्यसंग्रह नाथ पब्लिकेशन्स औरंगाबाद इ.स. १९९८
१० मोगडा वैचारिक साहित्यसेवा प्रकाशन औंगाबाद इ.स. १९९७
११ पंचधारांचा प्रदेश वैचारिक चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद १७ सप्टेंबर इ.स. २००४
१२ बलुतेदार समाजचिंतन संवेदना प्रकाशन, औरंगाबाद, ६ डिसेंबर इ.स. १९९५
१३ वेध आणि वेधक समीक्षा कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, फेब्रुवारी १९८८
१४ प्रतिभेचे प्रदेश समीक्षा कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद, जानेवारी २००३
१५ साहित्याचे वर्तन आणि वर्तमान समीक्षा साकेत प्रकाशन, औरंगाबाद इ.स. २००८
१६ वेदनांचा प्रदेश संशोधन कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद मार्च २०००

संपादन[संपादन]

 • जास्वंद - मराठवाड्यातील महाविद्यालयीन विध्यार्थ्यांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रह इ.स. १९७४
 • युवाकंप - बाबा आमटे विशेषांक इ.स. १९८१
 • युवाकंप - नरहर कुरुंदकर विशेषांक इ.स. १९८४
 • जातक (प्रा. दत्ता भगत गौरवग्रंथ) कैलाश पब्लिकेशन्स औरंगाबाद,जुलै २००५
 • सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक( म.जोतीराव फुले - कैलाश पब्लिकेशन्स औरंगाबाद,१८ जुलै २००८
 • दु:खाविषयी निबंध (मुक्ता साळवे यांचा निबंध) चिन्मय प्रकाशन औरंगाबाद २००६
 • मराठवाड्यातील साहित्य - कैलास पब्लिकेशन्स औरंगाबाद १७ सप्टेंबर २००७
 • निवडक उत्तम कांबळे - कैलास पब्लिकेशन्स औरंगाबाद, डिसेंबर २०१०
 • आस्वाद आणि समीक्षा (प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या निवडक प्रस्तावना) स्वरूप प्रकाशन औरंगाबाद १९ फेब्रुवारी २०१४

पुरस्कार[संपादन]

 •  नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार[७]
 • ”वेध आणि वेधक” या समीक्षा ग्रंथाला महात्मा फुले पुरस्कार इ.स. १९९३
 • ‘बलुतेदार’ या समाजचिंतनपर ग्रंथाला विश्वकर्मा पुरस्कार इ.स. १९९६
 • ’मोगडा’ या वैचारिक ग्रंथाला लोकपीठ पुरस्कार इ.स. २००४
 • ’आले ढग...गेले ढग’ या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार इ.स. १९९८-१९९९
 • ’प्रतिभेचे प्रदेश’ या समीक्षा ग्रंथाला अविष्कार साहित्य मंडळ नांदेड यांचा कवी भारत भूषण पुरस्कार नोव्हेंबर २००३
 • पंचाधारांचा प्रदेश’ या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा वा.ल.कुलकर्णी समीक्षा आणि सौंदर्यशास्त्र पुरस्कार इ.स. २००४ -०५
 • बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे या संशोधनपर ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार इ.स. २०१६
 • औरंगाबाद महानगरपालिकेकडून गुणवंत नागरिक पुरस्कार इ.स. १९९९
 • सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती औरंगाबाद इ.स. २००७
 • अंबड गौरव पुरस्कार शहीद भगतसिंग गणेश मंडळ अंबड इ.स. २०१२
 • अण्णाभाऊ साठे साहित्यभूषण पुरस्कार, साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे कला अकादमी व संशोधन केंद्र लातूर २०१४
 • कै. नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य पुरस्कार, कै. नरहर कुरुंदकर स्मृती संस्था अंबाजोगाई इ.स. २०१६

सन्मान[संपादन]

 • अध्यक्ष : नववे मराठवाडा युवक साहित्य संमेलन, मरडसगाव जि.परभणी
 • अध्यक्ष : अविष्कार साहित्य समेलन, परतूर जि. जालना
 • अध्यक्ष : पहिले मराठवाडा युवा साहित्य समेलन, औरंगाबाद(आयोजक :- कैलास पब्लिकेशन्स व म.सा.प. औरंगाबाद)
 • अध्यक्ष :१८ वे नरहर कुरुंदकर स्मृती साहित्य समेलन, नांदेड (आयोजन- अविष्कार साहित्य मंडळ ,नांदेड)
 • अध्यक्ष : दुसरे मराठी साहित्य समेलन, शिरूर अनंतपाळ जि. लातूर (आयोजक :- मराठी साहित्य सेवा मंडळ)

विद्यापीठीय अधिकार मंडळे व विविध समित्या[संपादन]

 • सदस्य : विद्या परिषद, २००१ ते २००३, जून २०१५ ते मार्च २०१६
 • सदस्य : ग्रंथालय समिती, २००६ ते २००९
 • सदस्य :कमवा व शिका, विद्यार्थी निवड समिती, २००५ -२००७
 • सदस्य : विद्यार्थी सहाय्य निधी समिती, २००५ -२००७
 • सदस्य : विद्यापीठ अध्यापन आणि संशोधन मंडळ २००६ -२००९ व २०१० ते २०११
 • सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती इ.स. २००६ ते २००९ व २०१० ते २०११
 • सदस्य : विद्यापीठ सुवर्ण महोत्सव समिती २००७ ते २००८
 • सदस्य : मराठी अभ्यास मंडळ २००६ ते २००९ आणि २०१० ते २०११
 • सदस्य : व्यवस्थापन परिषद जून २०१५ ते मार्च २०१६
 • सदस्य सचिव : परीक्षा मंडळ  जून २०१५ ते मार्च २०१६
 • सदस्य : विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या आणि अधिव्याख्यात्यांच्या निवड समितीवर माननीय कुलगुरू यांचे प्रतिनिधी आणि विषयतज्ज्ञ
 • सदस्य : प्राचार्य संघटना कार्यकारिणी
 • अध्यक्ष : विद्यापीठ संलग्नीकरण समिती
 • सदस्य सचिव : शिक्षकांच्या नियत वयोमान वाढीसंदर्भात गठीत समिती (६० वरून ६२ करण्यासंदर्भात) पडताळणी समिती.

अन्य विद्यापीठीय समितीत सहभाग[संपादन]

 • सदस्य : मराठी अभ्यास मंडळ, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा
 • सदस्य : मराठी अभ्यास मंडळ, कर्नाटक विद्यापीठ, धारवाड
 • सदस्य :भाषा विद्याशाखा,  महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा
 • सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
 • सदस्य : संशोधन आणि मान्यता समिती, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

शासकीय समित्यांचे सदस्य[संपादन]

 • सदस्य सचिव : बी.एड. प्रवेश समिती इ.स. २००१
 • सदस्य : पुन:संपादन मंडळ (कुमारभारती इ.१० वी आणि युवभारती इ.१२ वी मराठी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे २००७
 • सदस्य : अभ्यास मंडळ (कुमारभारती इ.१० वी आणि युवभारती इ.१२ वी मराठी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे २००७ ते २००९
 • सदस्य : भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य, सन २०११ ते २०१५

अभ्यसक्रमात ग्रंथाचा व लेखांचा समावेश[संपादन]

 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. मराठी प्रथम वर्गासाठी “प्रतिभेचे प्रदेश’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश
 • साठोत्तरी वाङ्मयीन प्रवाह : दलित साहित्य या अभ्यासपत्रिकेसाठी “वेदनांचे प्रदेश’’ या पुस्तकाचा संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी. कॉम, बी.एस्सी., दुसऱ्या वर्षाच्या द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमात संपादित ग्रंथ “साहित्य लेणी” यातील “व्यावसायिक कोंडी” या बलुतेदार या पुस्तकातील लेखाचा समावेश.
 • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे एम.ए. च्या अभ्यासक्रमात “अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा क्रमिक पुस्तक म्हणून समावेश
 • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए., बी. कॉम, बी.एस्सी.च्या वर्गांच्या दुसऱ्या वर्षाच्या द्वितीय भाषेच्या अभ्यासक्रमात ‘कासीम रझवीशी बातचीत’ या कवितेचा समावेश.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "'पत्रकारांनी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन लढण्याची गरज'". Eenadu English Portal (mr मजकूर). 2018-06-18 रोजी पाहिले. 
 2. ^ जास्वंदाची फुले : प्रल्हाद लुलेकर : व्यक्ती आणि साहित्य. औरंगाबाद: चिन्मय प्रकाशन. ३ मार्च २०१६. pp. २९० ते २९३. आय.एस.बी.एन. 978-98-84593-10-0 Check |isbn= value (सहाय्य). 
 3. ^ "Delhi Public Library catalog › Results of search for 'pb:स्वरुप प्रकाशन'". delhipubliclibrary.in (en मजकूर). 2018-06-18 रोजी पाहिले. 
 4. ^ "Balutedaranchi Hatyare Aani Avjare by Dr. Pralhad G. Lulekar". Half Price Books India. 2018-06-18 रोजी पाहिले. 
 5. ^ "Books". www.bookganga.com. 2018-06-11 रोजी पाहिले. 
 6. ^ "GAIR DALITON KE BHI UDHHARAK BABASAHEB DR. AMBEDKAR | Samyak Prakashan". www.samyakprakashan.in. 2018-06-11 रोजी पाहिले. 
 7. ^ "डॉ. प्रल्हाद लुलेकर यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार -Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2016-01-17. 2018-06-11 रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]