बाबुजी देशमुख व्याख्यानमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बाबुजी देशमुख व्याख्यानमाला ही विदर्भातल्या अकोला शहरात इ.स. १८६४ साली सुरू झालेली नामांकित व्याख्यानमाला आहे. वादविवाद, निबंध, भाषण आदी स्पर्धांमधून विद्यार्थी तयार करताना अकोल्यातील एका वाचनालयाने लोक जागरास्तव या व्याख्यानमालेची सुरुवात केली. विशिष्ट विचारधारेला शरण न जाता वक्ता शोधणे, विषय देणे, लोकांपर्यंत तो पोहचवणे आदी कार्य व्याख्यानमालेतून केले जाते.

वाचनालयाच्या ताब्यात असलेल्या सिनेमाघराच्या उत्पन्नातून व्याख्यानमाला चालवली जाते. शासकीय अनुदानावर अथवा लोकवर्गणीवरती अवलंबून राहण्याची पद्धत नाही, त्यामुळे या व्याख्यानमालेने आपला दर्जा कायम राखला आहे. व्याख्यानमालेच्या काळात सतत ९ दिवस पाचशे ते सहाशे श्रोते येतात, विचारांची देवाण घेवाण करतात.

या व्याख्यानमालेत अनंत आठवले, अमरेंद्र गाडगीळ, अब्दुल कादर मुकादम, अरुण साधू, अविनाश धर्माधिकारी, डॉ.अशोक कामत, अशोक मोडक, अशोक राणे, असीम सरोदे, आचार्य अत्रे, आचार्य रजनीश, डॉ.आनंद यादव, प्रा.आनंद हर्डीकर, आलोक भटाचार्य, आश्वनाथ आर्थेकर, डॉ.आ.ह. साळुंखे, इंदुमती काटदरे, इंद्रजित भालेराव, इसाक मुजावर, ऊर्मिला पवार, डॉ.एम.डी.नलावडे, कुमार केतकर, कुमार शास्त्री, कृ.ब. महाबळ, के.नारायण काळे, गंगाधर पानतावणे, अ‍ॅड. गणेश हलकारे, ग.वा. कवीश्वर, ग.वा. बेहेरे, गिरिराज किशोर, गिरीश कुबेर, डॉ.गिरीश जाखोटीया, गो.नी. दांडेकर, गोविंदराव टेंबे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, चारुशीला ओक, चिंतामणराव देशमुख, डॉ.जुल्फी शेख, तारा भवाळकर, दत्ता बाळ, प्रा.दत्ता भगत, द.मा. मिरासदार, दाजी पणशीकर, डॉ.दामोदर खडसे, दीनदयाल गुप्त, देवीदास बागुल, नरहर कुरंदकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रा. नारायण कुलकर्णी कवठेकर, निर्मलकुमार फडकुले, प्रा. पी.बी.पाटील, पु.भा.भावे, पुरुषोत्तम पाटील, पुरुषोत्तम बोरकर, पु.ल. देशपांडे, प्रतापराव भोसले, प्रतिभा रानडे, डॉ. प्रभा गणोरकर, बा.गं. खापर्डे, बा.भ.कर्णिक, डॉ.बा.वा. दातार, बा.ह. कल्याणकर, बाळ सामंत, बी.टी. देशमुख, ब्रह्मानंद देशपांडे, भाई वैद्य, भाऊसाहेब पाटणकर, भारती ठाकुर, भुजंग वाडीकर, डॉ. भूपाल गुरव, म.ग.नातू,मंगला आठवले, प्रा. मधुकर जामकर, मनोहर सप्रे, मधुकर आष्टीकर, मधुकर वाकोडे, माधुरी शानभाग, मालतीबाई दांडेकर, मिर्झा बेग, मुकुंद संगोराम, मुजफ्फर हुसैन, डॉ. मु.ब. शहा, यशवंत पाठक, यशवंत मनोहर, यु.म.पठाण, र.गो. कोकजे, रंगनाथ पठारे, राजन गवस, राम कोलारकर, राम शेवाळकर, डॉ.रूपा कुलकर्णी, लक्ष्मीकांत तांबोळी, लक्ष्मीकांत देशमुख, व.पु. काळे, वासुदेव भोळे, डॉ. विजया डबीर, विजया वाड, विठ्ठल वाघ, विद्याधर गोखले, डॉ. विनय वाईकर, विनया खडपेकर, वि.भि.कोलते, विलास पाटील, विश्राम बेडेकर, विश्वास पाटील, विश्वास मेंहेंदळे, विश्वास सायनाकार, डॉ. वि.स. जोग, डॉ. वेदप्रकाश मिश्र, शंकर पाटील, शकुंतला परांजपे, शं.ना. नवरे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, शाहू मोडक, प्रा. शिवाजीराव भोसले, शिवाजी सावंत, शुभांगी भडभडे, प्रा.शेषराव मोरे, शैल जेमिनी, श्याम फडके, श्रीकांत तिडके, श्रीकांत सिनकर, श्री.नी.चापेकर, श्रीराम पुजारी, संजीवनी खैर, प्रा.सदानंद मोरे, सुनीता तगारे, सुभाषचंद्र बोस, सुभाष भेंडे, सुरेश द्वादशीवार, सेतुमाधवराव पगडी, सोपानदेव चौधरी, डॉ. स्मिता अवचार, ह.भा. भिडे, ह.मो. मराठे, ह.रा. महाजनी, हरिशंकर परसाई, आदी नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे.

महाराष्ट्र शासनाने या वाचनालयाला २००६-२००७ या वर्षातले उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून गौरविले आहे.