अकोला किल्ला
Appearance
(असदगड या पानावरून पुनर्निर्देशित)
अकोला किल्ला | |
नाव | अकोला किल्ला |
उंची | |
प्रकार | भुईकोट |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | अकोला, महाराष्ट्र |
जवळचे गाव | अकोला अकोला महाराष्ट्र |
डोंगररांग | |
सध्याची अवस्था | अव्यवस्थित |
स्थापना | १६९८ |
अकोला शहरातील हा भुईकोट किल्ला असदगड नावाने ओळखला जातो. हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असदखॉंच्या देखरेखीखाली १६९८ मध्ये बांधून पूर्ण केला (ईदगाह वरील शिलालेख). हा खरे तर किल्ला नसून संरक्षक तटबंदीचा बुरूज आहे. या तटबंदीस कधीकाळी असद बुरूज, फतेह किवा पंच बुरूज, अगरवेस बुरूज असे एकूण तीन बुरूज होते, त्यांतील पहिले दोनच शिल्लक आहेत. असद बुरूजालाच असदगड म्हणून ओळखले जाते. तटबंदीस पूर्वी दहीहंडा वेस, अगर वेस, गंज वेस आणि शिवाजी किंवा बाळापूर वेस असे चार दरवाजे होते. त्यांपैकी पहिले दोन दरवाजे शिल्लक आहेत. यांतील अगर वेस ही गोविंद आप्पाजी याने १८४३ साली बांधली. असद बुरूजावर हवामहल म्हणून एक अर्धवट पडकी इमारत आहे. ह्या इमारतीत असदखॉं राहात असावा.