एप्रिल १८
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०८ वा किंवा लीप वर्षात १०९ वा दिवस असतो.
| << | एप्रिल २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | |||||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी[संपादन]
अकरावे शतक[संपादन]
- १०२५ - बोलेस्लॉ पहिला क्रॉब्री पोलंडच्या राजेपदी.
सोळावे शतक[संपादन]
- १५१८ - बोना स्फोर्झा पोलंडच्या राणीपदी.
एकोणिसावे शतक[संपादन]
- १८८० - मार्शफील्ड, मिसूरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
विसावे शतक[संपादन]
- १९०६ - कॅलिफोर्नियात सान फ्रांसिस्को येथे रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.८ तीव्रतेचा भूकंप. यात व यामुळे लागलेल्या आगीत सगळे शहर उद्ध्वस्त. ३,००० ते ६,००० ठार, हजारो जखमी.
- १९१२ - टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेउन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - पिएर लव्हाल विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलँड हे बेट उद्ध्वस्त केले.
- १९४६ - लीग ऑफ नेशन्स विसर्जित.
- १९५४ - गमाल अब्दल नासरने ईजिप्तमध्ये सत्ता बळकावली.
- १९८० - झिम्बाब्वेला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८३ - बैरुतमध्ये अमेरिकेच्या वकीलातीवर आत्मघातकी हल्ला. अनेक सैनिकांसह ६३ ठार.
- १९९२ - अफगाणिस्तानमध्ये जनरल अब्दुल रशीद दोस्तमने अहमद शाह मसूदशी हातमिळवणी करून राष्ट्राध्यक्ष नजिबुल्लाह विरुद्ध उठाव केला.
- १९९६ - लेबेनॉनच्या कानामधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतींवर इस्रायेलचा हल्ला. १०२ नागरिक ठार.
एकविसावे शतक[संपादन]
- २००७ - क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.
जन्म[संपादन]
- १५९० - पहिला एहमेद.
- १९०२ - ज्युसेप्पे पेला, इटलीचा पंतप्रधान.
- १९१० - विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
- १९४७ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
- १९५४ - रिक मोरानिस, केनेडियन अभिनेता.
- १९५८ - माल्कम मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू[संपादन]
- १९४३ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
- १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- २००२ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
- २००४ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन[संपादन]
- स्वातंत्र्य दिन - झिम्बाब्वे.
- सेना दिन - इराण.
बाह्य दुवे[संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - (एप्रिल महिना)