नोव्हेंबर ६
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले.
- १८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला.
- १८६१ - जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला.
- १८६५ - अमेरिकन यादवी युद्ध - जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
विसावे शतक [संपादन]
- १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसर्यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली.
- १९६५ - क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले.
- १९८५ - कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले.
- १९८६ - ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
- २००२ - पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार.
- २००४ - इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी.
- २००५ - अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार.
- २००५ - म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली.
- २००६ - इराकच्या भूतपूर्व हुकुमशहा सद्दाम हुसेनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
जन्म [संपादन]
- १४९४ - सुलेमान, ऑट्टोमन सम्राट.
- १६६१ - कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा.
- १८४१ - आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १८६० - इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७६ - अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
- १८९७ - जॅक ओ'कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - ऍलन लिसेट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२१ - जॉफ राबोन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - सॅली फील्ड, अमेरिकन अभिनेत्री.
- १९४८ - ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार.
- १९५६ - ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- १२३१ - त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १४०६ - पोप इनोसंट सातवा.
- १६३२ - गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा.
- १६५६ - होआव चौथा, पोर्तुगालचा राजा.
- १७९६ - कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी.
- १८३६ - चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा.
- १८९३ - पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार.
- १९२५ - खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा.
- १९२९ - मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८७ - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान.
- गुस्ताफस ऍडोल्फस दिन - स्वीडन.
नोव्हेंबर ४ - नोव्हेंबर ५ - नोव्हेंबर ६ - नोव्हेंबर ७ - नोव्हेंबर ८ - नोव्हेंबर महिना
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर ६ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)