अॅल्बर्ट आइन्स्टाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अल्बर्ट आइनस्टाइन या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅल्बर्ट आइन्स्टाइन
Einstein1921 by F Schmutzer 4.jpg
ओरेन जे. टर्नर याने काढलेले आइन्स्टाइनचे छायाचित्र (इ.स. १९४७)
जन्म मार्च १४, इ.स. १८७९
उल्म, व्युर्टेंबर्ग, जर्मनी
मृत्यू एप्रिल १८, इ.स. १९५५
प्रिन्स्टन, न्यू जर्सी, अमेरिका
निवासस्थान जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, अमेरिका
नागरिकत्व जर्मन (इ.स. १८७९-इ.स. १८९६, इ.स. १९१४-इ.स. १९३३)

स्विस (इ.स. १९०१-इ.स. १९५५)
अमेरिकन (इ.स. १९४०-इ.स. १९५५)

धर्म ज्यू
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
कार्यसंस्था त्स्युरिक विद्यापीठ
चार्ल्स विद्यापीठ, प्राग
प्रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस
कायसर विल्हेल्म इन्स्टिट्यूट

लायडन विद्यापीठ
इन्स्टिट्यूट फॉर ऍडव्हान्स्ड स्टडी

प्रशिक्षण ईटीएच्‌ त्स्युरिक
ख्याती सापेक्षतावाद
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक (इ.स. १९२१)
कॉप्ली पदक (इ.स. १९२५)
माक्स प्लांक पदक (इ.स. १९२९)

आइन्स्टाइन यांनी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांना लिहिलेल्या स्झिलर्ड पत्रावरील स्वाक्षरी: Albert Einsteins signature

अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन (जर्मन: Albert Einstein ;) (मार्च १४, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहर्‍यांपैकी एक बनले. "आइन्स्टाइन" या नावाचा अनेक ठिकाणी वापर (आणि/किंवा गैरवापर) होऊ लागला. त्या प्रकारांमुळे वैतागलेल्या आइन्स्टाइन यांनी "अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नसावा. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे.त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी , आइन्स्टाइन याने विचार केला की,न्युटनी यांत्रिकी ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपारिक यांत्रिकी हिच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धांत याला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्व क्षेत्र यावर वर्धित आहे आणि त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुवर्ती गुरुत्वीय सिद्धांत यावरून सामान्य सापेक्षता सिद्धांत नावाने एक पत्र प्रकाशित केले . सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धांत यांच्या समस्यांची उकल काढण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धांत स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाचा औष्णिक गुणधर्म याचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धांत मांडता आला.१९१७ साली,आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धांत स्पष्टीकरणासाठी भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.[१]

त्यांनी अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत एडॉल्फ हिटलर १९३३ मध्ये सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन हे जेथे प्राध्यापक असलेले प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी येथे परत जाण्यास नकार दिला होता. ते अमेरिकेत स्थायिक झाले.१९४० मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. [२] दुसरे महायुद्ध पूर्वसंध्येला , आइन्स्टाइन यांनी एक पत्र अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांना लिहिले. ज्यात त्यांनी नमूद केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी असे आवाहन केले परंतु याला दुजोरा न देत अमेरिकेने मॅनहॅटन प्रकल्प उभारला .आइन्स्टाइन यांनी सैन्याच्या संरक्षणाच्या धोरणाचा स्वीकार केला परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या केंद्रकीय विखंडन या तत्त्वावर चालणाऱ्या शस्त्रांचा निषेध केला.काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटीश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्याशी संपर्क साधून रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा यावर स्वाक्षरी केली.या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते.आइन्स्टाइन हे अमेरिकेतील प्रिन्स्टन,न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्युट फॉर अड्व्हान्स्ड स्टडी या शिक्षण संस्थेशी मरणोत्तर संलग्न राहिले.१९५५ साली त्याचा मृत्यू झाला.

आइन्स्टाइन यांनी एकूण ३०० वैज्ञानिक पत्रे तसेच एकूण १५० अवैज्ञानिक पत्रे संपूर्ण आयुष्यात प्रकाशित केली.[३]त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिरी आणि कल्पकता यामुळे शब्द अलौकिक बुद्धिमत्ता याला आइन्स्टाइन हे नाव समानार्थी झाले आहे.[४]

चरित्र[संपादन]

बालपण[संपादन]

अ‍ॅल्बर्ट आइन्स्टाइन यांचा जन्म जर्मनी देशातील वुर्टेंबर्गमधील उल्म या गावामध्ये झाला, उल्म स्टुटगार्टपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाइन हे व्यवसायाने विक्रेता होते आणि त्यांनी नंतर विद्युत-रासायनिक पदार्थांशी निगडित कारखाना काढला. अ‍ॅल्बर्टच्या आईचे नाव पौलिन होते आणि त्या गृहिणी होत्या. ते एक ज्यू कुटुंब होते. अ‍ॅल्बर्ट तेथील एक कॅथॉलिक प्राथमिक शाळेत शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी व्हायोलिन या तंतुवाद्याचे काही धडे घेतले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा ल्युत्पोल्ड व्यायामशाळेत(सध्या आईन्स्टाइन व्यायामशाळा)प्रवेश झाला. येथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यापुढील सात वर्षानंतर त्यांनी जर्मनी सोडली.[५]त्यांच्या पहिल्या शाळेत त्यांच्या भाषणाच्या अनेक समस्यांना सामोरे जाऊन त्यांनी अनेक प्रसिद्ध दाव्यांच्या अगदी उलट प्रतिपादन केले.[६]जगप्रसिद्ध विचार की, ते डावखोरे होते या विचाराचा आजतागायत पुरावा सापडलेला नाही.[७]


एकदा आइन्स्टाइन यांना त्यांच्या वडलांनी एक होकायंत्र दिले;आइन्स्टाइन यांना जाणीव झाली की, स्पष्टपणे दिसणारे 'रिक्त अवकाश' आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल यांमागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे.[८] ते जसजसे मोठे होत गेले तसतसे,आइन्स्टाइन यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती तसेच यांत्रिक उपकरणे बनवून आपली गणिताची कसब दाखवू लागले.जेव्हा आइन्स्टाइन दहा वर्षाचे होते,तेव्हा मॅक्स टॅलमड (नंतर मॅक्स टॅल्मी) या पोलंडमधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख आइन्स्टाइन यांच्या भावाने त्यांच्या कुटूंबाशी करून दिली.पाच वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमड हा दर आठवडा लहानग्या ॲल्बर्टला अनेक विज्ञानविषयक पुस्तके,गणितीय कोडी तसेच तत्त्वज्ञानविषयक लिखाणे देत असे.या पुस्तकात इमॅन्युएल कँण्ट्स यांचे शुद्ध कारणाचे समालोचन हे पुस्तक तसेच युक्लिडचे घटक या पुस्तकांचा समावेश होता(आइन्स्टाइन त्या पुस्तकाला एक पवित्र भूमिती पुस्तकअसे म्हणत.)[९][१०] ॲल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्याच्या घरातून सुरू झाली.त्यांची ही एक उत्कृष्ट पियानोवादक होती,ही कला त्यांनी अल्बर्टला शिकवली.त्यांचे मामा जेकब यांनी ॲल्बर्टला गणितं सोडवून दाखवण्याची शर्थ लावली,ही गणितं ॲल्बर्टने अतिशय आनंदात सोडवली.मॅक्स टॅलमडच्या इ.स.१८८९ ते इ.स.१८९४ दर आठवड्यात होणा-या महत्त्वपूर्ण भेटीत टॅलमड यांनी आणलेल्या अनेक अल्प धार्मिक अवस्था दाखवून 'बायबलमधील अनेक गोष्टी या असत्य असू शकतात या विचाराकडे ॲल्बर्टचे मन वळवले.ॲल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की,ते प्रतलीय भूमितीची अवघड गणिते(जी त्यांच्या अभ्यासक्रमातही नव्हती) चुटकीसरशी सोडवत असत. [११]

शाळेतील दिवस[संपादन]

अ‍ॅल्बर्ट यांना शाळेतील दिवसात मंदगतीने शिकणारा समजण्यात येत असे. कदाचित या मागील कारण आरोग्यविषयक बाबींशी निगडित असावे. परंतु सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताचे काही श्रेय त्यांनी त्यांच्या धीम्या गतीने शिकण्याला दिले, कारण इतरांच्या तुलनेत काळ आणि अवकाश हे उशिराने शिकल्यामुळे ते एकप्रकारे प्रगत पद्धतीने विचार करू शकले.

दंतकथा[संपादन]

अ‍ॅल्बर्टच्या मंदगतीने शिकण्याला एक दंतकथा जोडली गेली. अ‍ॅल्बर्ट हे गणित विषयात कच्चे होते आणि त्या विषयात वारंवार नापास झाल्याने त्यांच्या शिक्षकाने त्यांना त्या कारणास्तव शाळेबाहेर काढले (आणि वगैरे). पुढे जेव्हा सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर त्या शिक्षकांनी त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त केले की "अ‍ॅल्बर्टसारखा मुलगा असा शोध लावेल हे तेव्हा स्वप्नातही वाटले नाही आणि आताही ते खरे वाटत नाही". परंतु त्या मागील खरे कारण असे आहे की त्या वर्षी श्रेणीबदलाच्या नव्या नियमांमुळे थोडा गोंधळ उडाला होता. त्यामुळे या दंतकथेचा जन्म झाला असावा.

जर्मनीतून स्थलांतर[संपादन]

इ.स. १९३३ साली आइन्स्टाइनने अ‍ॅडॉल्फ हिटलर याच्या नेतृत्वाखालील वाढत्या नाझी शक्तीचा प्रभाव लक्षात घेऊन जर्मनीतून अमेरिकेत हलायचे ठरवले.

हेसुद्धा पाहा[संपादन]

विकिक्वोट
अॅल्बर्ट आइन्स्टाइन हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.

संदर्भ[संपादन]

"

 1. "Scientific Background on the Nobel Prize in Physics 2011. The accelerating universe." (page 2) Nobelprize.org.
 2. .
 3. "Paul Arthur Schilpp, editor 1951 730–746">Paul Arthur Schilpp, editor (1951), Albert Einstein: Philosopher-Scientist, Volume II, New York: Harper and Brothers Publishers (Harper Torchbook edition), pp. 730–746 His non-scientific works include: About Zionism: Speeches and Lectures by Professor Albert Einstein (1930), "Why War?" (1933, co-authored by Sigmund Freud), The World As I See It (1934), Out of My Later Years (1950), and a book on science for the general reader, The Evolution of Physics (1938, co-authored by Leopold Infeld).
 4. WordNet for Einstein.
 5. John J. Stachel (2002), Einstein from "B" to "Z", Springer, pp. 59–61, ISBN 978-0-8176-4143-6, <http://books.google.com/books?id=OAsQ_hFjhrAC&pg=PA59>. Retrieved on २० फेब्रुवारी २०११ 
 6. .
 7. .
 8. Schilpp (Ed.), P. A. (1979), Albert Einstein – Autobiographical Notes, Open Court Publishing Company, pp. 8–9 
 9. M. Talmey, The Relativity Theory Simplified and the Formative Period of its Inventor. Falcon Press, 1932, pp. 161–164.
 10. Dudley Herschbach, "Einstein as a Student", Department of Chemistry and Chemical Biology, Harvard University, Cambridge, Massachusetts, USA, pp. 4–5, web: HarvardChem-Einstein-PDF
 11. Einstein as a Student, pp. 3–5.

"

बाह्य दुवे[संपादन]