ऑक्टोबर २१
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
साचा:ऑक्टोबर२०१३ ऑक्टोबर २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९४ वा किंवा लीप वर्षात २९५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५२० - फर्डिनांड मॅगेलन मॅगेलनच्या सामुद्रधुनीत पोचला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८२४ - जोसेफ ऍस्पडिनने पोर्टलँड सिमेंटचा पेटंट घेतला.
- १८६७ - मॅनिफेस्ट डेस्टिनी-मेडिसिन लॉजचा करार - स्थानिक अमेरिकन लोकांना पश्चिम ओक्लाहोमामध्ये स्थलांतर करणे भाग पाडले गेले.
- १८७९ - थॉमस अल्वा एडिसनने पहिल्यांदा कार्बन तंतू वापरून विजेचा दिवा चालवला. साडेतेरा तास चालल्यावर हा दिवा विझला.
- १८९५ - जपानने फॉर्मोसाचे प्रजासत्ताक जिंकले.
विसावे शतक [संपादन]
- १९४४ - दुसरे महायुद्ध-लेयटे गल्फची लढाई - एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया वर जपानी विमानांनी आत्मघातकी हल्ला चढवला.
- १९४५ - फ्रांसमध्ये स्त्रीयांना पहिल्यांदाच मतदानाची संधी.
- १९५९ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवरने वटहुकुम काढून वर्नर फोन ब्रॉन व त्याच्या सहकार्यांना अमेरिकन सैन्याच्या आधिपत्याखालून काढून घेउन नासामध्ये काम करण्यास फर्मावले.
- १९६६ - वेल्स च्या ऍबरफॅन गावावर कोळश्याच्या खाणीतून आलेल्या ढिगार्याखाली अनेक बालकांसह १४४ ठार.
- १९६९ - सोमालियात लश्करी उढाव. सियाद बारे सत्तेवर.
- १९८३ - निर्वात जागेतून १/२९,९७,९२,४५८ सेकंदात प्रकाशाने पार पाडलेल्या अंतर ही मीटरची व्याख्या ठरवली गेली.
- १९९४ - सोलमधील सेओंग्सू पूल कोसळून ३२ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
जन्म [संपादन]
- १६६० - जॉर्ज अर्न्स्ट स्टाल, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १६७५ - हिगाशीयामा, जपानी सम्राट.
- १६८७ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १७१२ - सर जेम्स स्ट्युअर्ट, ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ.
- १७९० - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.
- १८२१ - एदुआर्द हाइन, जर्मन गणितज्ञ.
- १८३३ - आल्फ्रेड नोबेल, स्विडीश रसायनशास्त्रज्ञ.
- १८५१ - जॉर्ज उलियेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - मार्टिन गार्डनर, अमेरिकन गणितज्ञ.
- १९१६ - राम मराठे, मराठी संगीतकार.
- १९१७ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.
- १९२३ - सद्गुरु श्री वामनराव पै, जीवन विद्या मिशनचे संस्थापक.
- १९४० - जॉफ बॉयकॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - बिन्यामिन नेतान्याहू, इस्रायेलचा नववा पंतप्रधान.
- १९५२ - ट्रेव्हर चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५७ - वॉल्फगांग केटर्ल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५९ - केन वाटानाबे, जपानी अभिनेता.
- १९६९ - सलमान विन हमाद बिन इसा अल खलिफा, बहरैनचा युवराज.
- १९७१ - डेमियन मार्टिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९९८ - अजित, हिदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- १२६६ - बिर्जर यार्ल, स्टॉकहोमचा स्थापक.
- १४२२ - चार्ल्स सहावा, फ्रांसचा राजा.
- १५०० - गो-त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट.
- १५०५ - पॉल स्क्रिप्टोरिस, जर्मन गणितज्ञ.
- १६८७ - सर एडमंड वॉलर, इंग्लिश लेखक.
- १७७७ - सॅम्युएल फूट, इंग्लिश नाटककार व अभिनेता.
- १८०५ - होरेशियो नेल्सन, इंग्लिश दर्यासारंग.
- १८७२ - जाक बॅबिने, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७३ - योहान सेबास्टियन वेलहावेन, नॉर्वेजियन कवी.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- सफरचंद दिन - युनायटेड किंग्डम.
- अनिवासी चिनी दिन - चीन.
ऑक्टोबर १९ - ऑक्टोबर २० - ऑक्टोबर २१ - ऑक्टोबर २२ - ऑक्टोबर २३ (ऑक्टोबर महिना)