पिएर लव्हाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिएर लव्हाल (जून २८, इ.स. १८८३ - ऑक्टोबर १५, इ.स. १९४५) हा फ्रांसचा राजकारणी व पंतप्रधान होता.

लव्हाल एकूण चारवेळा फ्रांसच्या पंतप्रधानपदी होता. पैकी शेवटच्या वेळी त्याने नाझी जर्मनीधार्जिण्या विची फ्रांस सरकारमध्ये पंतप्रधानपद स्वीकारले. दुसरे महायुद्ध संपल्यावर या कारणास्तव त्याच्यावर शत्रूला साथ दिल्याचा व देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. अपराधी सिद्ध झाल्यावर लव्हालला मृत्युदंड देण्यात आला.