ऑक्टोबर १२
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ऑक्टोबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८५ वा किंवा लीप वर्षात २८६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
इ.स.पू. सहावे शतक [संपादन]
- ५३९ - महान सायरसच्या सैन्याने बॅबिलॉन जिंकले.
तेरावे शतक [संपादन]
- १२७९ - निचिरेनने आपल्या ग्रंथ दाइ-गोहोन्झोनची रचना केली.
पंधरावे शतक [संपादन]
- १४९२ - क्रिस्टोबाल कोलोन अमेरिकेजवळच्या बहामास द्वीपसमूहात पोचला. त्याला आपण भारतात पोचल्याचेच वाटले.
सतरावे शतक [संपादन]
- १६९२ - मॅसेच्युसेट्सच्या गव्हर्नर विल्यम फिप्सने खरमरीत पत्र पाठवून सेलमच्या चेटकीणींचे खटले बंद करवले.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८१० - ऑक्टोबरफेस्ट - म्युनिकच्या राजघराण्याने आपल्या राजकुमाराच्या लग्नाप्रीत्यर्थ म्युनिकच्या जनतेला बीयर पिण्यास मुक्त आमंत्रण दिले. यातून ऑक्टोबरफेस्टची सुरुवात झाली.
- १८२२ - पेद्रो पहिला ब्राझिलच्या सम्राटपदी.
- १८२३ - चार्ल्स मॅकिंटॉशने स्कॉटलँडमध्ये पहिला रेनकोट[मराठी शब्द सुचवा] विकला.
- १८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.
विसावे शतक [संपादन]
- १९०१ - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टने राष्ट्राध्यक्षीय निवासस्थानाचे नाव एक्झेक्युटिव्ह मॅन्शन बदलून व्हाइट हाउस असे ठेवले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना बेल्जियममधून पळून जाण्यास मदत केल्याबद्दल जर्मनीच्या सैन्याने परिचारिका इडिथ कॅव्हेलला गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
- १९१७ - पाशेंडेलेची पहिली लढाई - न्यू झीलँडच्या इतिहासताली सगळ्यात मोठी जीवितहानी.
- १९१८ - मिनेसोटात लागलेल्या वणव्यात ४५३ व्यक्ती मृत्युमुखी.
- १९२८ - चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टनमध्ये सर्वप्रथम कृत्रिम फुफ्फुसाचा उपयोग.
- १९६० - संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्हने टेबलावर जोडा आपटून आपला मुद्दा ठासवला.
- १९६२ - अमेरिकेच्या वायव्य भागातील वादळात ४६ ठार, २.३ कोटी अमेरिकन डॉलरचे नुकसान.
- १९६८ - विषुववृत्तीय गिनीला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १९७९ - द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी हे पुस्तक प्रकाशित.
- १९८३ - लॉकहीड कॉर्पोरेशनकडून दोन कोटी अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानच्या पंतप्रधान तनाका काकुऐला चार वर्षांचा कारावास.
- १९८४ - प्रोव्हिजनल आयरिश रिपब्लिकन आर्मी या दहशतवादी संघटनेने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर व तिच्या मंत्रीमंडळावर बॉम्बहल्ला केला. पाच ठार, थॅचर बचावली.
- १९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.
- १९९१ - असकार अकायेव किर्गिझस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध नियुक्त.
- १९९७ - अल्जीरियामध्ये पोलिस असल्याचे भासवून दहशतवाद्यांनी ४३ व्यक्तींची हत्या केली.
- १९९९ - परवेझ मुशर्रफने मियाँ नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.
एकविसावे शतक [संपादन]
- २००० - अमेरिकेच्या युद्धनौका यु.एस.एस. कोल वर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. १७ अमेरिकन सैनिक ठार, ३९ जखमी.
- २००२ - दहशतवाद्यांनी बालीतील दोन बारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. २०२ ठार, ३०० जखमी.
जन्म [संपादन]
- १००८ - गो-इचिजो, जपानी सम्राट.
- १५३७ - एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
- १७९८ - पेद्रो पहिला, ब्राझिलचा सम्राट.
- १८६१ - फ्रेडरिक मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८६६ - रामसे मॅकडॉनाल्ड, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९११ - विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - दम्मिका रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ६३८ - पोप ऑनरियस पहिला.
- ६४२ - पोप जॉन चौथा.
- १५७६ - मॅक्सिमिलियन दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १७३० - फ्रेडरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- स्वातंत्र्य दिन - विषुववृत्तीय गिनी.
- मातृ दिन - मलावी.
- हिस्पॅनिक दिन - स्पेन.
- कोलंबस दिन - अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
- स्थानिक संघर्ष दिन - व्हेनेझुएला.
- बाल दिन - ब्राझिल.
ऑक्टोबर १० - ऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर महिना