मे ४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.
| << | मे २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | २९ | ३० | ३१ | ||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
पंधरावे शतक [संपादन]
- १४९३ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले.
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाला पोचला.
सतरावे शतक [संपादन]
- १६२६ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८१४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला.
- १८६९ - हाकोदातेची लढाई.
विसावे शतक [संपादन]
- १९०४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९१० - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- १९१२ - इटलीने र्होड बेट बळकावले.
- १९२४ - १९२४ उन्हाळी ऑलिंपिक पॅरिसमध्ये सुरू.
- १९३० - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हांबुर्ग जवळ नॉएनगामे कॉँसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.
- १९४९ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार.
- १९७० - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणार्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी.
- १९७९ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९९० - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९६ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक [संपादन]
- २००२ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
जन्म [संपादन]
- १००८ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
- ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.
- १६५४ - कांग्क्सी, चीनी सम्राट.
- १९२८ - होस्नी मुबारक, इजिप्तचा पंतप्रधान.
- १९५७ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मार्टिन मॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - पॉल वाईझमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८४ - मंजुरल इस्लाम, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- १५०६ - हुसेन बयकराह, हेरतचा राजा.
- १७९९ - टिपू सुलतान.
- १९८० - जोसेफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- जागतिक कोळसा कामगार दिन.
- जागतिक अस्थमा दिन.
- स्मृती दिन - नेदरलँड्स.
- युवा दिन - चीन.
- स्वातंत्र्य दिन - लात्व्हिया.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर मे ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मे २ - मे ३ - मे ४ - मे ५ - मे ६ - (मे महिना)