जानेवारी ९
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१३ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९ वा किंवा लीप वर्षात ९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
चौदावे शतक [संपादन]
- १३४९ - प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.
पंधरावे शतक [संपादन]
- १४३१ - जोन ऑफ आर्क वर खटला सुरू.
अठरावे शतक [संपादन]
- १७६० - बराई घाटच्या लढाईत अफघानांकडून मराठ्यांचा पराभव.
- १७८८ - कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
- १८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.
- १८७८ - उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
- १८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा.
- १८८२ - ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
विसावे शतक [संपादन]
- १९१२ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
- १९१६ - कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.
- १९१७ - पहिले महायुद्ध - रफाची लढाई.
- १९४५ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
- १९५१ - न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
- १९६० - इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
- १९६४ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
- १९९१ - लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
- १९९७ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
- २००१ - चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.
- २०११ - इराण एर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.
जन्म [संपादन]
- १५५४ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १६२४ - मैशो, जपानी सम्राज्ञी.
- १८५९ - जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
- १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
- १९२७ - रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक ,समीक्षक.
- १९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.
- १९५६ - डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - जिमी ऍडम्स, वेस्ट-ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- १२८३ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्यूदंड).
- १८४८ - कॅरॉलीन हर्शेल - खगोलशास्त्रज्ञ.
- १८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
- १८७८ - व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.
- १९६१ - एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.
- १९७५ - प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.
- १९९७ - एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.
- १९९८ - केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.
- २००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.भारत
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - (जानेवारी महिना)