जानेवारी १०
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१३ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १० वा किंवा लीप वर्षात १० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
पहिले शतक [संपादन]
- ४९ - ज्युलियस सीझरने रुबिकोन नदी ओलांडली. इटलीतील गृहयुद्ध सुरू.
तिसरे शतक [संपादन]
- २३६ - संत फाबियान पोपपदी.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८०६ - बोअर युद्ध - केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
- १८१० - नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
- १८११ - लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
- १८६३ - लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.
विसावे शतक [संपादन]
- १९०१ - बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
- १९२० - लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
- १९२३ - लिथुएनियाने मेमेल बळकावले.
- १९२९ - टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
- १९४६ - लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
- १९५७ - हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९७२ - शेख मुजीबर रेहेमान हे पाकिस्तान च्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले.
- १९८९ - क्युबाने अँगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरूवात केली.
एकविसावे शतक [संपादन]
- २००१ - विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले.
जन्म [संपादन]
- १८१५ - सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
- १८६९ - ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
- १८७१ - ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८९६ - काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
- १९०३ - पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१७ - टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१८ - आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२७ - शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
- १९३३ - लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९४० - येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
- १९७४ - ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
- १९७५ - जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू [संपादन]
- ६८१ - पोप अगाथो.
- १०९४ - खलिफा अल् मुस्तान्सर.
- १२७६ - पोप ग्रेगोरी दहावा.
- १८६२ - सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
- १९१७ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
- १९२२ - ओकूमा शाइजनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - जानेवारी १२ - (जानेवारी महिना)