फेब्रुवारी २४
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | फेब्रुवारी २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ||
| ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
| १३ | १४ | १ | १६ | १७ | १८ | १९ |
| २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
| २७ | २८ | |||||
फेब्रुवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५५ वा किंवा लीप वर्षात ५५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.
अठरावे शतक [संपादन]
- १७३९ - कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८२६ - यांदाबूचा तह - म्यानमार व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.
- १८३१ - डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.
- १८४५ - फ्रांसचा राजा लुई-फिलिपने पदत्याग केला.
- १८६८ - अमेरिकेच्या अध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.
विसावे शतक [संपादन]
- १९१८ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १९३८ - दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.
- १९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.
- १९४५ - ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.
- १९४६ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
- १९७६ - क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.
- १९८९ - रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.
- १९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.
- १९९९ - चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.
एकविसावे शतक [संपादन]
- २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.
जन्म [संपादन]
- ११०३ - टोबा, जपानी सम्राट.
- १३०४ - इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.
- १५०० - चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट.
- १५५७ - मथियास, पवित्र रोमन सम्राट.
- १८८५ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(अॅडमिरल).
- १९३४ - बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.
- १९४२ - जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.
- १९४८ - जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.
- १९५५ - स्टीव जॉब्स, ऍपल कम्प्युटर्सचा संस्थापक.
मृत्यू [संपादन]
- ६१६ - एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.
- १७७७ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७९ - पॉल डॅनियल लॉँगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.
- १८१० - हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.
- १९२५ - ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
- स्वातंत्र्य दिन - एस्टोनिया.
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - (फेब्रुवारी महिना)