एप्रिल १७
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.
| << | एप्रिल २०१३ | >> | ||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
| ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
| १ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
| २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
| २९ | ३० | |||||
अनुक्रमणिका |
ठळक घटना आणि घडामोडी [संपादन]
पहिले शतक [संपादन]
पंधरावे शतक [संपादन]
- १४९२ - स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
सोळावे शतक [संपादन]
- १५२१ - मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
- १८९५ - माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
विसावे शतक [संपादन]
- १९३५ - सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
- १९६१ - पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
- १९७० - चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
- १९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
- १९८६ - सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
एकविसावे शतक [संपादन]
- २००२ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
जन्म [संपादन]
- ५९३ - जोमेइ, जपानी सम्राट.
- १७३४ - तक्सिन, थायलंडचा राजा.
- १८९४ - निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७२ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.
मृत्यू [संपादन]
- १०८० - हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
- १७११ - जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १८९१ - अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९३६ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९४४ - जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
- २००४ - सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
- २०१२ - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर एप्रिल १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल १५ - एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - (एप्रिल महिना)