जानेवारी १३
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| << | जानेवारी २०१३ | >> | |||||
| सो | मं | बु | गु | शु | श | र | |
| १ | |||||||
| २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
| ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
| १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
| २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
| ३० | ३१ | ||||||
जानेवारी १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३ वा किंवा लीप वर्षात १३ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
ठळक घटना [संपादन]
सोळावे शतक [संपादन]
- १५५९ - एलिझाबेथ पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
सतरावे शतक [संपादन]
- १६१० - गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
एकोणिसावे शतक [संपादन]
- १८४२ - काबुलमधुन माघार घेणार्या ब्रिटीश-भारतीय सैन्याच्या १६,५०० सैनिक व असैनिकांपैकी असिस्टंट सर्जन विल्यम ब्रायडन हा एकमेव जिवंत व्यक्ती जलालाबादला पोचला.
- १८४७ - काहुएन्गाचा तहाने कॅलिफोर्नियातील मेक्सिकन अमेरिकन युद्ध संपले.
- १८९३ - हवाईची राणी लिलिउओकालानीला संगीनी राज्यघटना अवैध ठरवण्यापासून अडविण्यासाठी अमेरिकन सैनिक होनोलुलुत उतरले.
विसावे शतक [संपादन]
- १९१५ - इटलीतील अवेझानो येथे भूकंप. २९,८०० ठार.
- १९३० - मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित.
- १९४२ - अमेरिकेने जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात पाठविण्यास सुरूवात केली.
- १९५३ - मार्शल जोसिप ब्रोझ टिटो युगोस्लाव्हियाच्या अध्यक्षपदी.
- १९८२ - वॉशिंग्टन डी.सी.च्या विमानतळावरून निघाल्यावर एर फ्लोरिडा फ्लाइट ९० हे बोईंग ७३७ जातीचे विमान कोसळले. रस्त्यावरील ४ सह ७८ ठार.
- १९९१ - लिथुएनियाची राजधानी व्हिल्नियस येथील स्वातंत्र्यसैनिकांवर रशियन सैनिकांनी हल्ला केला.
एकविसावे शतक [संपादन]
- २००१ - एल साल्वाडोरमध्ये भूकंप. ८००हून अधिक ठार.
- २००२ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
जन्म [संपादन]
- १३३४ - हेन्री दुसरा, कॅस्टिलचा राजा.
- १५९६ - यान फान गोयॉँ, डच चित्रकार.
- १६१० - मरिया आना, ऑस्ट्रियाची राणी.
- १९४८ - गज सिंघ, जोधपूरचा राजा.
- १९७७ - ऑरलॅन्डो ब्लूम, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
मृत्यू [संपादन]
- ७०३ - जिटो, जपानी सम्राज्ञी.
- ८५८ - वेसेक्सचा एथेलवुल्फ.
- ८८८ - जाड्या चार्ल्स, पवित्र रोमन सम्राट.
- ११७७ - हेन्री दुसरा, ऑस्ट्रियाचा राजा.
- १३३० - फ्रेडरिक पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
- १६९१ - जॉर्ज फॉक्स, क्वेकर्स या ख्रिश्चन पंथाचा स्थापक.
- १७६६ - फ्रेडरिक पाचवा, डेन्मार्कचा राजा.
- १९२९ - वायट अर्प, अमेरिकन शेरिफ.
- १९७८ - ह्युबर्ट एच. हम्फ्री, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९८८ - च्यांग चिंग-कुओ, तैवानचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
- बीबीसी न्यूजवर जानेवारी १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ११ - जानेवारी १२ - जानेवारी १३ - जानेवारी १४ - जानेवारी १५ - (जानेवारी महिना)